Nigdi : एकतर्फी प्रेमातून मित्राने केला तरुणीचा विनयभंग

एमपीसी न्यूज – एकतर्फी प्रेमातून तरुणीचे वडील घरी नसताना मित्राने घरी जाऊन तरुणीसोबत अश्लील कृत्य केले. तसेच तरुणी कॉलेजला गेली असता तिचा पाठलाग करून तिचा विनयभंग केला. ही घटना बुधवारी (दि. 18) निगडी येथे घडली.

याप्रकरणी 18 वर्षीय पीडित तरुणीने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तरुण व फिर्यादी एकमेकांच्या ओळखीचे असून मित्र-मौत्रिणी आहेत. फिर्यादीचे वडील त्यांच्या मूळगावी गेले असता आरोपी फिर्यादीच्या घरी गेला. तिथे आरोपीने ‘माझे तुझ्यावर प्रेम आहे’ असे म्हणत अश्लील कृत्य केले. तसेच दुस-या दिवशी फिर्यादी कॉलेजला गेली असता, तिचा पाठलाग केला. तिला अडवून ‘शेवटचे सांग तू माझ्यासोबत बोलणार आहेस की नाही’ असे बोलत फिर्यादीच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.