Pimpri: तळवडेतील महिलेचे रिपोर्ट पॉझिटीव्ह

one more coronavirus positive case in Talwade in Pimpri Chinchwad. कोरोनाग्रस्तांचा आकडा 170 वर, 76 जण कोरोनामुक्त, सात जणांचा मृत्यू

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील तळवडे भागातील एका 28 वर्षीय महिलेचे आज (शनिवारी)  रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे सक्रिय रुग्णांची संख्या 69 झाली आहे. तर, आजपर्यंत शहरातील आणि शहराबाहेरील पण वायसीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत अशा 170 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर, 76 जण कोरोनामुक्त झाले असून सात जणांचा मृत्यू झाला आहे.

महापालिकेचे अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिलेल्या माहितीनुसार, महापालिकेने शुक्रवारी (दि. 8) 104 कोरोना संशयितांचे नमुने तपासणीसाठी एनआयव्ही आणि ‘नारी’कडे पाठविले होते. त्याचे काही रिपोर्ट सकाळी आले आहेत. त्यामध्ये तळवडेतील एका 28 वर्षीय महिलेचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. त्यांच्यावर वायसीएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत. महापालिका रुग्णालयात 69 सक्रिय रूग्णांवर उपचार सुरु आहेत. तर, शहरातील आठ रुग्णांवर महापालिका हद्दीबाहेरील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

दरम्यान, 12 एप्रिल रोजी थेरगाव भागातील एका पुरुषाचा, 20 एप्रिल रोजी निगडीतील एका महिलेचा आणि पुण्यातील रहिवाशी पण वायसीएममध्ये दाखल असलेल्या एका महिलेचा आणि  24 एप्रिल रोजी  निगडीतील एका पुरुष रुग्णाचा, 29 एप्रिल रोजी खडकीतील एका महिलेचा, 6 मे रोजी पुण्यातील शिवाजीनगर येथील महिलेचा आणि येरवडा येथील एका महिलेचा  वायसीएम रुग्णालयात अशा सात जणांचा कोरोनामुळे आजपर्यंत मृत्यू झाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.