Pimpri News : कोरोनाचा पहिला रुग्ण आढळण्याला एक वर्ष पूर्ण

रुग्णवाढ, रुग्णवाढीचा आलेख उतरणीस, लसीकरण आणि पुन्हा रुग्णवाढ

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात 10 मार्च 2020 रोजी कोरोनाचे पहिला तीन रुग्ण आढळले होते. त्याला आज एक वर्ष पूर्ण होत आहे. रुग्णवाढ, वाढीचा आलेख उतरणीस, लसीकरण आणि पुन्हा रुग्णवाढ असे चक्र वर्षभरात राहिले आहे. जून, जुलै, ऑगस्टमध्ये सर्वाधिक रुग्णवाढ झाली. सप्टेंबरमध्ये रुग्णवाढीचा आलेख उतरणीस आला होता. आता पुन्हा फेब्रुवारीपासून रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होऊ लागली. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात 10 मार्च रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला होता. मार्च, एप्रिल आणि अर्धा मे महिना कोरोनाची रुग्णसंख्या नियंत्रणात होती. जून, जुलै, ऑगस्टमध्ये रुग्णसंख्या वाढीचा वेग मोठा राहिला. जुलै, ऑगस्ट या दोन महिन्यात कोरोनाची सर्वाधिक रुग्णवाढ झाली. शहरातील कोरोनाचा पहिला बळी 12 एप्रिल रोजी गेला  होता. जुलै महिन्यात मृत्यूचे प्रमाण  जास्त होते. त्याखालोखाल ऑगस्टमध्ये मृत्यूचे प्रमाण होते. त्या तुलनेत सप्टेंबरमध्ये कमी झाले होते.

महापालिकेने केलेल्या उपाययोजना, कोरोना योद्ध्यांच्या प्रयत्नांना यश आले. सप्टेंबर महिन्यात रुग्णवाढीचा आलेख उतरणीस आला होता. सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी 2021 पर्यंत रुग्णसंख्या आटोक्यात होती. दिवासाला 100 च्या आतमध्ये रुग्णसंख्या आली होती. परंतु, फेब्रुवारीनंतर पुन्हा शहरातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होवू लागली आहे. मागील काही दिवसांपासून 500 ते 600 नवीन रुग्णांची भर पडत आहे.

_MPC_DIR_MPU_II

शहरातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण होते. सक्रिय रुग्णांपेक्षा बरे होणा-या रुग्णांचा दर चांगला होता. मृत्यू दर देखील कमी करण्यात वैद्यकीय विभागाला यश आले होते. कोणताही मृत्यू दुर्दैवीच आहे. पण, इतर शहरांच्या तुलनेत पिंपरी-चिंचवड महापालिकेचा कोरोनाचा मृत्यूदर एक ते दीड टक्क्यांच्या आसपास होता.

वर्षभरात 1 लाख 10070 बाधित, त्यातील 1 लाख 3232 कोरोनामुक्त

वर्षभरात पिंपरी-चिंचवड शहरातील 1 लाख 10070 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 1 लाख 3232 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली. शहरातील 1861 जणांचा तर शहराबाहेरील  परंतू महापालिका रूग्णालयात उपचार  घेणार्‍या 785 अशा 2646 जणांचा वर्षभरात कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या 1370 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. आजपर्यंत 43 हजार 271 जणांनी कोरोनाची लस घेतली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.