Chakan : भाव पडल्याने कांदा उत्पादक आक्रमक

कांद्याचे लिलाव बंद पाडले ; पुणे नाशिक महामार्ग रोखला

एमपीसी न्यूज : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये बुधवारी  (दि. 29 मार्च ) सकाळी कांद्याच्या भावात मोठी घसरण झाली. त्यानंतर कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाले. आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी कांद्याचे लिलाव बंद पाडले. (Chakan) त्यानंतर सर्व शेतकरी पुणे नाशिक महामार्गावर जमले. सकाळी अकरा ते साडेबारा असा सुमारे दोन तास शेतकर्यांनी महामार्ग रोखून धरला.  पोलीस आणि तालुका प्रशासनाने अनेकदा विनंती करूनही शेतकरी हमी भाव द्या अशी मागणी महामार्गावर बसून होते. अखेरीस पोलिसांनी बळाचा वापर करून शेतकर्यांना बाजूला केले.

कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाले असून कांद्याला योग्य दर मिळावा यासाठी लिलाव बंद पाडले . मात्र, लिलाव बंद पाडून शासनाला जाग येणार नाही अशी भूमिका घेत शेकडो शेतकरी शासनच्या विरोधात संतप्त घोषणाबाजी करत थेट पुणे नाशिक महामार्गावर आले.

Pimpri News : संतोष घुले यांचा ‘हिंदुस्तानरत्न राष्ट्रीय पुरस्कारा’ने सन्मान

 

चाकण मध्ये सकाळी साडेअकरानंतर शेतकऱ्यांनी पुणे नाशिक महामार्ग रोखून धरला . महामार्गावर रस्त्याच्या दुतर्फा पाच ते सात किलोमीटर पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या.(Chakan) दुपारी एकच्या सुमारास शेतकर्यांना चाकण पोलिसांनी जबरदस्तीने रस्त्यातून बाजूला करत महामार्ग वाहतुकीसाठी खुला केल्याचे स्थानिक पत्रकार अविनाश दुधवडे यांनी सांगितले. 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.