Pimpri: पिंपरी-चिंचवड दर्शन बससेवेसाठी ऑनलाईन तिकिट बुकिंग सुविधा पुन्हा सुरू

एमपीसी न्यूज – काही महिन्यांपुर्वी प्रवाशांच्या प्रतिसादाअभावी बंद झालेली पिंपरी-चिंचवड दर्शन बससेवा पुणे महानगर परिवहन महामंडळा (पीएमपीएल) तर्फे पुन्हा सुरू करण्यात आली आहे.  दर्शन बससेवेसाठी ऑनलाईन तिकिट बुकिंग सुविधा देखील सुरु करण्यात आली आहे.

पीमएपीएलतर्फे पुणे दर्शन ही बससेवा सुरू आहे. त्याच धर्तीवर पिंपरी-चिंचवड शहर परिसरातील प्रेक्षणीय स्थळांची माहिती नागरिकांना व्हावी, यासाठी पिंपरी-चिंचवड दर्शन बससेवा सुरू करण्यात आली आहे.

या दर्शन बससेवे अंतर्गत एकूण दोन बस सुरू करण्यात आल्या असून एक बस निगडीहून सुटणार आहे. ही बससेवा आयकॉन मंदिर, मोरया गोसावी मंदिर, मंगलमुर्ती वाडा, चापेकर वाडा, चापेकर बंधू स्मारक, सायन्स पार्क बर्ड व्हॅली, देहूगाव, देहू गाथा मंदिर, अप्पूघर, दुर्गा टेकडी अशी दहा ठिकाणे फिरणार आहे.

दुसरी बस भोसरी येथून निघणार असून ती शिवसृष्टी, सायन्स पार्क, चापेकर बंधू स्मारक, मोरया गोसावी मंदिर, मंगलमुर्ती वाडा, चापेकर वाडा, इस्कॉन मंदिर, अप्पूघर, दुर्गा टेकडी, बर्ड व्हॅली, आळंदी आदी दहा ठिकाणे दाखविण्यात येणार आहेत.

या पिंपरी-चिंचवड बससेवेचे तिकिट बुकिंग नागरिकांना, पर्यटकांना सुरळीतपणे करता यावे, यासाठी पीएमपीएलतर्फे ऑनलाईन बुकिंग सुविधा सुरू करण्यात आली आहे. पीएमपीएलच्या pmpml.org या संकेतस्थळावर पर्यटक, नागरिकांनी तिकिट बुकिंग करावे आणि पिंपरी-चिंचवड दर्शन बससेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.