Pimpri : महापालिका शिक्षकांना इंग्रजीचे ऑनलाईन धडे

एमपीसी न्यूज – जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था, पुणे व प्रादेशिक आंग्ल भाषा तत्वज्ञ औरंगाबाद व महापालिका शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने महापालिका शाळेच्या शिक्षकांना ऑनलाईन इंग्रजीचे धडे देण्यात येणार आहे.

शहरातील महापालिकेच्या शिक्षकांचे इंग्रजी भाषेचे ज्ञान वृद्धिंगत व्हावे यासाठी या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. पिंपरी गावातील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात शिक्षकांचे ऑनलाईन रजिस्ट्रेशन देखील करण्यात आले आहे. महापालिका शाळेतील जवळपास ४०० शिक्षक हे प्रशिक्षण पूर्ण करणार आहेत.

यावेळी जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेच्या अधिव्याख्यात्या सुवर्णा तोरणे, सचिन ढोबळे, तज्ज्ञ मार्गदर्शक अनिल कर्पे, समन्वयक नीता खाडे, प्रतिभा नेवेकर, पर्यवेक्षक सुगंधा मेमाणे, राजेंद्र थोरात, संतोष जाधव आदी उपस्थित होते.

या प्रक्षिक्षणामध्ये नावनोंदणी केल्यानंतर लगेच लॉगिन करायचे आहे. यामध्ये व्हिडिओद्वारे शिक्षकांना इंग्रजीचे पाठ शिकविण्यात येणार आहेत. तसेच काही प्रश्नोत्तरे दिली जाणार आहेत, शिक्षकांच्या उपलब्धतेनुसार हे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यामुळे वर्ग सांभाळून शिक्षकांना यात भाग घेता येणार आहे, असे समन्वयक नीता खाडे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.