Nigdi : चारचाकी कार जिंकल्याचे सांगत तरुणीची चार लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – तुम्ही चारचाकी कार जिंकला आहात. ती घेण्यासाठी तुम्हाला प्रोसेसिंग फी म्हणून काही रक्कम भरावी लागेल. असे म्हणत तरुणीकडून बँकेची गोपनीय माहिती घेऊन खात्यावरून 3 लाख 80 हजार रुपये काढून आर्थिक फसवणूक केली. हा प्रकार 20 फेब्रुवारी ते 14 मार्च 2018 दरम्यान फोनवर घडला.

_MPC_DIR_MPU_II

शिवानी कुमारजगजितसिंग राठौड (वय 31, रा. व्यंकटेश अपार्टमेंट, स्कीम नंबर 10, एलआयसी कॉर्नरजवळ, यमुनानगर, निगडी. मूळ. रा. वामतारा अपार्टमेंट, कुसूमविहार, मोराबादी रांची, झारखंड) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार कबीर कपूर व नेहारिका (पूर्ण नाव माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवानी मूळच्या झारखंड राज्यातील असून नोकरीनिमित्त त्या निगडी भागात राहतात. 20 फेब्रुवारी ते 14 मार्च 2018 या कालावधीत त्यांना एका लँडलाईन फोनवरून फोन आले. फोनवरून कबीर कपूर व नेहारिका बोलत असल्याचे सांगण्यात आले. तसेच शिवानी या एका स्पर्धेमध्ये होंडा अमेझ ही चारचाकी कार जिंकल्या आहेत. तिचा ताबा मिळविण्यासाठी रजिस्ट्रेशन फी आणि अन्य कारणांसाठी आगाऊ रक्कम भरावी लागेल असे सांगण्यात आले. आरोपींनी शिवानी यांना त्यांचा पे फोन चा मोबाईल नंबर आणि बॅंकेचा खातेक्रमांक दिला. तसेच शिवानी यांच्याकडून त्यांच्या दोन बँकेची गोपनीय माहिती घेतली. त्याद्वारे आरोपींनी शिवानी यांच्या दोन बँकांच्या खात्यातून 3 लाख 80 हजार रुपये काढले. शिवानी यांना कार दिली नाही. स्वतःची फसवणूक झालेचे लक्षात येताच त्यांनी पोलिसात तक्रार दिली. निगडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) शंकर आवताडे तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.