Hadapsar : डेटिंग सर्व्हिसेस  पोर्टल मधून बाहेर पडण्याची फी मागून तब्बल साडेसहा लाखांची केली फसवणूक

एमपीसी न्यूज- डेटिंग सर्व्हिसेस मधील पोर्टल मधून बाहेर पडा अन्यथा प्रोफाईलशी लिंक झालेली मुलगी तुमच्याविरूद्ध  तक्रार करेल. असे सांगून, पोर्टल मधून बाहेर पडण्याची फि मागून जवळपास साडेसहा लाखांची ऑनलाईन फसवणूक केल्याची घटना घडली आहे. मांजरी- बुद्रुक येथील एका 34 वर्षीय इसमाची फसवणूक करण्यात आली.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना अज्ञात बॅंकेच्या खातेधारकांनी संगनमत करून त्यांना वेगवेगळ्या मोबाईलनंबर वरून फोन करून तुमचे प्रोफाईल गोल्ड क्लब पोर्टलमध्ये वर्ल्ड डेटिंग सर्व्हिसेस मध्ये दिसत असून तुमचे प्रोफाईल एका मुलीशी लिंक झाले आहे असे सांगितले. आणि जर तुम्हाला या पोर्टल मधून बाहेर पडायचे असेल तर काही फी भरावी लागेल आणि
जर तुम्ही यातून बाहेर पडाला नाही तर लिंक झालेली मुलगी तुमच्याविरूद्ध तक्रार करेल असे सांगितले.

त्या अज्ञात इसमांनी फिर्यादीला अशा प्रकारे भीती घालून वेळोवेळी पैसे भरण्यास भाग पाडले. अशाप्रकारे फिर्यादीने तब्बल 6 लाख 59 हजार 800 इतकी रक्कम भरली. याप्रकरणी पुढील तपास हडपसर पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.