Online Fraud : क्रेडिट कार्डवर रिवॉर्ड मिळाल्याचे सांगत 34 हजारांचा ऑनलाईन गंडा

एमपीसी न्यूज – बँकेच्या क्रेडिट कार्ड विभागातून बोलत असल्याचे भासवून अनोळखी व्यक्तीने क्रेडिट कार्डवर रिवॉर्ड मिळाले असल्याचे सांगून 34 हजार रुपयांची (Online Fraud) फसवणूक केली. ही घटना एक सप्टेंबर रोजी भोसरी परिसरात घडली.

याप्रकरणी श्री दिगंबरभिमरावजी पराये (वय 55 रा.भोसरी)यांनी फिर्याद दिली असून 30 सप्टेंबर रोजी 7027326569 या क्रमांकावरून बोलणाऱ्या अनोळखी व्यक्ती विरोधात (Online Fraud ) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी यांना फोन केला. फोनवरील व्यक्ती एसबीआय बँकेच्या क्रेडिट कार्ड विभागातून बोलत असल्याचे त्याने सांगितले.

Nigdi Crime News: शेअर बाजारातील गुंतवणुकीच्या आमिषाने 13 लाखांची फसवणूक

त्यावरून फिर्यादी यांच्या क्रेडिट कार्डवर रिवॉर्ड प्राप्त झाले असल्याचे सांगत विश्वास संपादन केला. तसेच फिर्यादी यांच्या मोबाईलवर आलेला ओटीपी शेअर करण्यास भाग पाडून फिर्यादींच्या क्रेडिट कार्ड मधून 34 हजार 680 रुपये रक्कम ऑनलाईन ट्रान्सफर करत त्यांची फसवणूक केली. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.