Thergaon : ऑनलाईन जॉब दोन महिलांना पडला 8 लाखांना

एमपीसी न्यूज – ऑनलाईन कामाचे आमिष दाखवून (Thergaon) दोन महिलांची आठ लाख 90 हजारांची फसवणूक करण्यात आली. ही घटना 21 फेब्रुवारी ते 4 मार्च या कालावधीत थेरगाव येथे घडली.

याप्रकरणी 35 वर्षीय महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कनिका चौहान नावाने बोलणाऱ्या महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Bhosari Crime News : विजबिल भरण्याच्या बहाण्याने पावणेदोन लाखांची फसवणूक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेने फिर्यादी महिलेस फोन करून त्यांना लिओ बरनेट मीडिया ग्रुप कंपनीमध्ये ऑनलाईन रिव्हिव्ह देण्याच्या कामाचे आमिष दाखवले.(Thergaon) त्यांचा विश्वास संपादन करून त्यांना फोनपे द्वारे विविध खात्यांवर ऑनलाईन 8 लाख 25 हजार रुपये भरण्यास भाग पाडले. तसेच कलाटेनगर येथील एका महिलेकडून अशाच प्रकारे 65 हजार रुपये घेऊन त्यांना कोणत्याही प्रकारची नोकरी अथवा परतावा न देता फसवणूक केली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.