Nigdi News : आयआयसीएमआर मध्ये ‘अल्ट्रिक्स आणि टॅबपाय’ विषयावर ऑनलाईन व्याख्यान

एमपीसी न्यूज – औद्योगिक तंत्र शिक्षण संस्थेच्या इन्स्टिटयूट ऑफ इंडस्ट्रियल अँड कॉम्प्युटर मॅनॅजमेन्ट अँड रिसर्च, निगडी या संस्थेत एमसीएच्या विद्यार्थ्यांसाठी ‘अल्ट्रिक्स आणि टॅबपाय’ या विषयावर माहितीपर व्याख्यान आयोजित करण्यात आले. डायरेक्टर-एमसीए डॉ. दीपाली सवाई यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी (दि. 12) ऑनलाईन माध्यमातून हे व्याख्यान झाले.

अर्ली सॅलरी डॉट कॉमचे असिस्टंट मॅनेजर ऍनालिटिक्स नवीन जाधव यांनी अल्ट्रिक्स ऍप्लिकेशन्स आणि प्रोडक्टस, तसेच टॅबपाय फ्रेमवर्क विषयी माहिती दिली.

महाविद्यालयामध्ये एमसीएच्या विद्यार्थ्यांचे गट तयार करण्यात आले आहेत. त्यातील डेटा मायनिंग या गटाशी निगडित असलेल्या अॅनालिटीक्स टूलशी निगडित हे व्याख्यान घेण्यात आले. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमात आणि पर्यायाने व्यावसायिक क्षेत्रात मोठी मदत होते. सुमारे 50 विद्यार्थी या व्याख्यानाला उपस्थित होते.

कार्यक्रमाचे पूजा काळंगे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. प्रिया देशपांडे यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.