मावळ विचार मंचाने आयोजित केलेल्या ऑनलाईन सरस्वती व्याख्यानमालेचा आज सायं सात वाजता शुभारंभ

0

एमपीसी न्यूज : वडगाव मावळ  येथील मावळ विचार मंचाने आयोजित केलेल्या ऑनलाईन सरस्वती व्याख्यानमालेचा आज शनिवार (दि 17) रोजी घटस्थापनेच्या मुहूर्तावर सायं सात वाजता शुभारंभ होणार असल्याची माहिती मंचाचे मुख्यप्रवर्तक भास्कर (अप्पा) म्हाळसकर  व मंचाचे कार्याध्यक्ष डाॅ रवींद्र आचार्य यांनी दिली आहे. 

दरवर्षी प्रमाणे याही वर्षी नवरात्रीमहोत्सवात व्याख्यानमालेचे आयोजन केले आहे, मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व्याख्याने ऑनलाईन होणार असल्याचे म्हाळसकर यांनी सांगितले आहे. व्याख्याने  शनिवार (दि 17) ते शनिवार (दि 24) या कालावधीत सायंकाळी सात वाजता होतील.

त्यामध्ये शनिवार दि 17 रोजी वक्त्या   सामाजिक कार्यकर्त्या मेधाताई कुलकर्णी ह्या स्त्री शक्तीचा जागर या विषयावर बोलणार आहेत तर सोमवार दि 19 रोजी औरंगाबाद जिल्ह्यातील पाटोदा गावचे आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील, आदर्श गाव कसे असावे या विषयावर भाष्य करणार आहेत. बुधवार दि 21 रोजी हभप गणेशमहाराज वाघमारे हे चित्त असू द्यावे समाधानी या विषयावर निरुपण करणार आहेत.

शुक्रवार दि 23 रोजी प्रसिद्ध अभिनेते यतीन कार्येकर हे रूपेरी दुनिया व शनिवार दि 24 रोजी आय ए एस विश्वासराव पाटील हे छत्रपती संभाजी राजे या विषयावर बोलणार आहेत.

रविवार दि 25 ऑक्टोबर रोजी 5:30 वा विजयादशमीनिमित्त भारत मातेचे पूजन केले जाईल. अशी माहिती यावर्षीचे अध्यक्ष दीपक भालेराव यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.