Vadgaon Maval News : विचारांच्या आधारे चालणारी गावेच प्रगती करतात – प्रा. जयवंत आवटे

एमपीसी न्यूज – एकमेकांचा आदर करण्यासाठी जीवन जगताना सकस साहित्य व सकस संगत हवी. जे गाव विचारांच्या आधारावर चालते, तेच गाव टिकते आणि तेच गाव पुढे जाऊन प्रगती करते.  येणारा काळ हा संपत्तीने, पैशाने वा धनाने दिपवता येणार नाही. तर विचाराच्या आधारावर समाजाला दिपवावं लागणार आहे, असे प्रतिपादन व्याख्याते जयवंत आवटे यांनी केले.

येथील मावळ विचार मंचने आयोजित केलेल्या सरस्वती व्याख्यानमालेत दुसरे पुष्प गुंफताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे व प्रमुख पाहूणे म्हणून श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे उपस्थित होते.

मंचाचे संस्थापक भास्कर आप्पा म्हाळसकर, कार्याध्यक्ष डॉ रविंद्र आचार्य, यावर्षीचे अध्यक्ष शंकर भोंडवे, नगरसेवक प्रविण चव्हाण, किरण म्हाळसकर, दिनेश ढोरे, प्रसाद पिंगळे, नगरसेविका अर्चना म्हाळसकर, आप्पा वाघवले, नंदकुमार दंडेल, नामदेव ढोरे, किरण भिलारेसह मोठ्या संख्येने नागरीक व महिलाभगिनी उपस्थित होत्या.

मावळ विचार मंच आयोजित सरस्वती व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प गुंफत त्यांनी सावली नावाची कथा सांगितली. त्या कथेतून आवटे यांनी झाडांची महती सांगून वृक्ष तोड करू नका. झाडे जगवा तसेच कष्टाच्या कमाईशिवाय पर्याय नसल्याचे सांगितले.

श्रीरंग आप्पा बारणे व बापूसाहेब भेगडे यांनी मनोगत व्यक्त करून व्याख्यानमाला उपक्रमाचे विशेष कौतुक केले व शुभेच्छा दिल्या. सन्मानपत्राचे वाचन कार्याध्यक्षा वैशाली म्हाळसकर यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन पोटोबा महाराज देवस्थान संस्थानचे सचिव अनंता कुडे यांनी केले तर आभार रविंद्र काकडे यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.