जैन मंदिर, मशिदींसह सर्व मंदिरे खुली करा : चंद्रकांत दादा पाटील

एमपीसी न्यूज – जैन मंदिरे खुली करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे. जैन मंदिर, मशिदी यांच्यासह सर्व मंदिरे खुली करावी, अशी आमची प्रमुख मागणी असल्याचा पुनरुच्चार भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज केला. 

पुणे विधानभवन (कौन्सिल हॉल) येथे विधान परिषद पदवीधर मतदारसंघासाठी संग्राम देशमुख यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी ते आले होते.

प्रदेशाध्यक्ष पाटील, जशी पोटाची भूक असते. तशी मनाची आणि बुद्धीची भूक भागविण्यासाठी ज्याची श्रद्धा आहे ते मंदिरात जाऊ शकतात. पण ज्याची श्रद्धा नाही, ज्यांना थोतांड वाटते. त्यांना मंदिरात जाणे बंधनकारक नाही. ज्यांना भक्ती करायची आहे. त्यांना का थांबवले जाते, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

तसेच काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी हाथरस येथील पीडित कुटुंबाची भेट घेण्याचा प्रयत्न करणारे राहुल गांधी जळगाव येथे येणार का, कारण आज जळगाव जिल्ह्यात एका दलित मुलीवर अत्याचाराची घटना समोर आली आहे, अशी राजकीय टीकाही त्यांनी यावेळी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.