Open Schooling : मुक्त विद्यालयाच्या पाचवी ते आठवीच्या प्रवेशासाठी 1 ते 31 डिसेंबर दरम्यान अर्ज करता येणार
एमपीसी न्यूज – महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळाच्या इयत्ता पाचवी ते आठवीसाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना 1 ते 31 डिसेंबर दरम्यान ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळाने याबाबत माहिती दिली आहे.
पत्रकात दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थ्यांना 1 ते 31 डिसेंबर रात्री 12 वाजेपर्यंत ऑनलाईन नावनोंदणी करून अर्ज भरता येणार आहे. 2 डिसेंबर ते 2 जानेवारी 2021 या कालावधीत विद्यार्थ्यांना मूळ अर्ज, शुल्क व मूळ कागदपत्रे अर्जावर नमूद केलेल्या संपर्क केंद्र शाळेत जमा करता येणार आहेत. 8 जानेवारी 2021 रोजी संपर्क केंद्र शाळांना विद्यार्थ्यांचे अर्ज व यादी विभागीय मंडळाकडे जमा करावा लागणार आहे.
विद्यार्थांना http://msbos.mh-ssc.ac.in/ या संकेतस्थळावरून अर्ज करता येणार आहे.