PCMC Election 2022 : शहर विकासासाठी स्वच्छ चारित्र्याच्या उमेदवारांना संधी, अर्ज करा – ‘आप’चे आवाहन

एमपीसी न्यूज – आम आदमी पार्टी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी सज्ज झाली आहे. महापालिकेच्या सर्व म्हणजे 139 जागा आप लढणार असून www.aappimprichinchwad.org/application-form-for-candidature/  या वेबसाईटच्या माध्यमातून शहरातील सर्व स्तरातील इच्छुक नागरिकांकडून उमेदवारी अर्ज मागवण्यात आले आहेत.

आपचे शहर प्रवक्ते प्रकाश हगवणे यांनी सांगितले की, निवडणुकीच्या निमित्ताने पिंपरी-चिंचवड आणि पुणे महापालिका क्षेत्रात आपतर्फे प्रचाराला सुरुवात झाली असून व पक्षाची कामे लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम सुरू आहे. शहरासाठी आणि शहरवासीयांसाठी भरीव योजनांची यादीच सादर करण्यात आली असून, त्यात शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधांचा विकास, स्वच्छ्ता, शहर सुशोभीकरण, कायदा सुव्यवस्था आदी महत्वपूर्ण मुद्द्यांवर भर देण्यात आला आहे.

आपल्या कामांच्या आणि कार्यकर्त्यांच्या मेहनतीच्या बळावर आप देखील महापालिकेच्या रिंगणात उतरत आहे. भ्रषटाचाराविरुद्धचा लढा, दिल्लीचे गव्हर्नन्स मॉडेल आणि सामान्य जनमानसाला केंद्र स्थानी ठेऊन सत्तेमार्फत मुलभूत बदल घडविण्याच वचन देत पक्ष निवडणूक रिंगणात तयारीने उतरला आहे. प्रस्थापितांना धक्का देण्याची ताकत फक्त आम आदमी पक्षात आहे हे अधोरेखित करत समाज आणि राजकारण बदलासाठी पुढे येत स्वच्छ चारित्र्याच्या जनसामान्यांना महापालिकेच्या निवडणुकीत उतरण्याचे आवाहन आपचे पिंपरी-चिंचवड कार्यकारी अध्यक्ष चेतन बेंद्रे यांनी केले आहे.

पक्षातर्फे सादर केलेल्या परिपत्रकाद्वारे इच्छुक उमेदवारांनी पिंपरी-चिंचवड तथा पुणे स्थित आपच्या नेत्यांशी संपर्क साधावा. तसेच ऑनलाईन अर्ज भरण्याची देखील व्यवस्था पक्षातर्फे करण्यात आलेली आहे. अर्ज स्वीकारनीनंतर इच्छुकांशी संपर्क साधण्यात येईल. पुढील उमेदवारी प्रक्रियेसाठी मार्गदर्शन करण्यात येईल असे आपचे पिंपरी-चिंचवड प्रचार प्रमुख राज चाकणे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.