Pune News : कौमार्य चाचणी आणि जातपंचायतीला विरोध करून ‘ते’ अडकले विवाहबंधनात

एमपीसी न्यूज : कंजारभाट समाजातील कुप्रथा असलेल्या कौमार्य चाचणी आणि जातपंचायतीला विरोध करून पुण्यातील धनंजय आणि प्रियंका मंगळवारी विवाहबंधनात अडकले आहेत. लग्नानंतर जात पंचायत आणि कोमार्य चाचणी होऊ दिली नाही असे ‘स्टॉप द व्ही रिच्यूअल’ चळवळ चालवणारे विवेक तमायचीकर यांनी सांगितले. 

अंबरनाथ येथील धनंजय तमायचिकर यांचा विवाह पुण्यातील प्रियांका इन्द्रेकर यांच्याशी वडगाव शेरी परिसरात संपन्न झाला. या लग्नाला दोन्ही कुटुंबातील सदस्य तसेच समाजातील पुढारलेले तरुण, तरुणी आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. या विवाहाच्या निमंत्रण पत्रिकेवरही कंजारभाट समाजातील अनिष्ट प्रथेविरोधातील मोहिमेला बळ द्यावे अशी विनंती करन्यात आली होती.

कोमार्य चाचणील आमचा सुरवाती पासूनच विरोध आहे. त्यामुळे जातपंचायतचा दबाव झुगारून आम्ही लग्न केले आहे. आम्ही तर कोमार्य चाचणी करणार नाही आणि इतरांमध्येही जनजागृती करू असे प्रियांका आणि धनंजय यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.