PimpleSaudagar : विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी पूरग्रस्तांना मदत करुन वाढदिवस साधेपणाने केला साजरा

एमपीसी न्यूज –  आपला वाढदिवस साधेपणाने साजरा करत भेटवस्तू न स्वीकारता पूरग्रस्त भागातील नागरिकांना उपयोगी पडतील अशा वस्तू वाढदिवसाची भेट स्वरूपात आणाव्यात, असे आवाहन नाना काटे यांनी केले होते. या आवाहनाला उस्फूर्त प्रतिसाद देत शहरातील नागरिकांनी मोठ्या स्वरूपात मदत केली.

नाना काटे सोशल फौंडेशनच्या कार्यकर्त्यांसोबत आज सांगली येथील पूरग्रस्त भागात नाना काटे यांनी भेट देत हे संपूर्ण मदत साहित्य पोहच केले. सांगली येथील राजारामबापू सहकारी साखर कारखान्यात जयंत पाटील यांच्या पत्नी शैलेजा देवी पाटील आणि चिरंजीव प्रतीक पाटील यांची भेट घेऊन सांगली पूरग्रस्त भागातील समस्या जाणून घेतल्या, अशी माहिती नाना काटे यांनी दिली. या मदत साहित्यात गहू, तांदूळ, आटा, दैनंदिन लागणाऱ्या वस्तूंचे किट, तेल, शालोपयोगी वस्तू, प्लास्टिक बकेट, टब, मग, ब्लँकेट, चादर, औषधे, कपडे, डाळी, साखर आदी वस्तू देण्यात आल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.