Rawet : आरक्षित स्मशानभूमीसाठी स्थानिकांसह राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचा विरोध

एमपीसी न्यूज –  रावेत येथील सेक्‍टर 32 अ मध्ये उभारण्यात येत असलेल्या स्मशानभूमीला स्थानिक रहिवाशांसह राष्ट्रवादीच्या स्थानिक नगरसेवकांनीही विरोध केला आहे. रहिवासी झोनमध्ये स्मशानभूमीची उभारणी केली जात असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.

प्राधिकरणाने रावेत येथील सेक्‍टर नंबर 29 व 32 अ, आरक्षण क्रमांक 596 ही जागा स्मशानभूमीसाठी आरक्षित केली आहे. 9 हजार 125.60 चौरस मीटर जागेतील स्मशानभूमीत वायुप्रदूषण नियंत्रण यंत्रणेसह गॅसवर आधारित आधुनिक शवदाहिनी उभारण्यात येत आहे. त्यासाठी 4 कोटी 62 लाखांचा खर्च अपेक्षित आहे. मात्र, या जागेजवळील सोसायट्यांमधील नागरिकांनी या स्मशानभूमीला विरोध दर्शविला आहे. रहिवासी झोनपासून केवळ 30 मीटर अंतरावर स्मशानभूमी असावी असा नियम असताना हा नियम फाट्यावर मारुन स्मशानभूमीचे काम सुरू असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. रावेत सेक्टर नंबर २९ व ३२ येथे होणाऱ्या आरक्षित नियोजित जागेवर स्मशानभूमीला स्थानिक रहिवाशांचा व माजी नगरसेवक मनोज खानोलकर यांचा विरोध आहे.

यामुळे येथे होणारे प्रदूषण नागरिकांच्या दृष्टीने हानिकारक आहे. तसेच काहीही झाले तरी या ठिकाणी स्मशानभूमी होऊ देणार नाही, अशी माजी नगरसेवक मनोज खानोलकर व नागरिकांनी मागणी केली. आज त्या ठिकाणी हे काम थांबवले आहे जर हे काम पुन्हा चालू करण्यात आले तर तीव्र आंदोलन करण्यात येईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.