Pune : आगामी दोन वर्षांत विरोधी पक्षांची भाजप विरोधात मोर्चेबांधणी

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेतील भाजपच्या सत्तेला काल 3 वर्षे पूर्ण झाले. 2022 मध्ये पुणे महापालिकेची निवडणूक होणार आहे. या कालावधीत भाजप विरोधात मोर्चेबांधणी करण्याची विरोधी पक्षांना चांगली संधी आहे. आगामी निवडणूक सिंगल वॉर्ड पद्धतीने होणार आहे.

मनसे, राष्ट्रवादी, काँगेस, शिवसेना, आरपीआय (आठवले गट), एमआयएम, असे सर्वच पक्ष आता निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. 2017 मध्ये पुणेकरांनी भाजपला एक हाती सत्ता देत तब्बल 98 नगरसेवक निवडून दिले होते. भाजपच्या महापालिकेतील कामाच्या परिणामामुळेच 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचा हडपसर आणि वडगावशेरी मतदारसंघात पराभवाला सामोरे जावे लागले.

शिवाय राज्यात काँगेस – राष्ट्रवादी – शिवसेनेचे महाविकास आघाडी सरकार असल्याने भाजपच्या पराभवासाठी सर्व विरोधी पक्ष एकत्र आले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.