Talegaon News : निवडणूक जवळ आल्याने सत्तारूढ भाजपला बदनाम करण्याचा विरोधकांचा प्रयत्न – गणेश भेगडे

एमपीसी न्यूज  – तळेगाव दाभाडे नगर परिषदेतील सार्वत्रिक निवडणूक जवळ आल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष व आमदार सुनील शेळके हे खोटेनाटे आरोप करून सत्तारुढ भारतीय जनता पक्षाला बदनाम करत असल्याचा पलटवर भाजपचे जिल्हा अध्यक्ष गणेश भेगडे यांनी केला.

तळेगाव शहर भारतीय जनता पक्षाने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत भेगडे बोलत होते. यावेळी शहराध्यक्ष रवींद्र माने, उपनगराध्यक्ष सुशील सैंदाणे, सभागृहनेते अरुण भेगडे पाटील, माजी नगराध्यक्ष रवींद्र दाभाडे, राजेंद्र जांभूळकर,चंद्रकांत शेटे, संतोष दाभाडे पाटील, अमोल शेटे, संतोष शिंदे यांच्यासह नगरसेवक,नगरसेविका व पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते

या अगोदरच्या काळात भारतीय जनता पक्ष काही अपवाद वगळता नगर परिषदेवर सत्तारुढ पक्ष म्हणून अनेक वर्ष काम करत आहे. या काळात शहराच्या विकासाचे आदर्श व्हिजन डोळ्यासमोर ठेऊन विविध योजना तळेगावासाठी राबविल्या आहेत. शहरातील पाणी योजना,भुयारी गटर योजना, तळेगावातील गोर गरीब नागरिकांसाठी हक्काची घरे, पंतप्रधान आवास योजनेतील घरे,हिंदमाता भुयारी मार्ग,व्यापारी संकुले,जैव विविधता उद्यान, शहरात सर्वत्र एलएडी दिवे लावणे आदि योजनासाठी शासनाचा निधी पक्षाने पाठपुरावा करून उपलब्ध करून मार्गी लावल्याचे भेगडे यांनी सांगितले. कचरा डेपो येथे कचरा विघटन यंत्रणा बसविली.

याशिवाय शहरातून कचरा वाहतुकीची स्वतंत्र यंत्रणा उभी केली. शहरात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड तसेच शहरात विविध विकास योजना राबविल्या.आमदार सुनील शेळके व त्यांच्या पक्षाच्या सहका-यांनी भारतीय जनता पक्षावर बेछूट व बिनबुडाचे आरोप करून पक्षाला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. हे खपवून घेतले जाणार नाही  असा इशारा या पत्रकार परिषदेत भेगडे यांनी दिला.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.