Weather Alert : तोक्ते ‘चक्रीवादळामुळे राज्यात ऑरेंज अलर्ट जारी

एमपीसी न्यूज : अरबी समुद्रात लक्षद्वीप बेटाजवळ ‘तोक्ते ‘चक्रीवादळामुळे राज्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. या चक्रीवादळाने आता दिशा बदलली असून ते कोकण, गोवा किनारपट्टीकडे सरकत आहे. या वादळात ताशी 50 किमी किंवा त्याहून जास्त वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

_MPC_DIR_MPU_II

चक्रीवादळामुळे राज्यात विविध ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यताही हवामान खात्याने वर्तवली आहे. या तोक्ते चक्रीवादळाची लाइव्ह स्थिती कशी पाहता येईल व हे विचित्र नाव कसे पडले याची माहिती येथे देत आहोत.

दक्षिणपूर्व अरबी समुद्रात तसेच लक्षद्वीपमध्ये गुरुवारी सकाळी कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने दि.16 मे रोजी चक्रीवादळात तयार होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. हे चक्रीवादळ ज्या मार्गावरून व ज्या वेगाने जाणार आहे, त्यावरून ते 18 मे रोजी किंवा नंतर गुजरात व पाकिस्तानच्या किनारपट्टीला धडकण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. परिणामी, या चक्रीवादळाच्या मार्गावरील म्हणजेच कोकण किनारपट्टी, मध्य महाराष्ट्र तसेच गुजरातेतील सर्वसामान्य नागरिकांनी खबरदारी घ्यावी म्हणून 16 ते 17 मे रोजी ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.