Pune News : विद्यापीठातील ‘सायन्स पार्क’ तर्फे विज्ञान दिवसानिमित्त वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

एमपीसी न्यूज  – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विज्ञान शिक्षण आणि संप्रेषण केंद्र (सायन्स पार्क) यांच्यातर्फे 28 फेब्रुवारी रोजी साजरा केल्या जाणाऱ्या राष्ट्रीय विज्ञान (Pune News) दिवसानिमित्त वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले आहे.

विद्यापीठातील विज्ञान शिक्षण आणि संप्रेषण केंद्राच्या माध्यमातून इयत्ता आठवी ते दहावी व महाविद्यालय स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा आयोजित केली आहे. विद्यार्थ्यांनी इंग्रजी किंवा मराठी भाषेत ‘ कोरोना महामारी आणि मी ‘ या विषयावर एक हजार शब्दांचे लिखाण ऑनलाईन पद्धतीने अपलोड करायचे आहे.

Sharad Pawar : देवेंद्र फडणवीस यांच्या पहाटेच्या शपथविधीविषयी गौप्यस्फोटावर शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया

निवडक लिखाणाचे सादरीकरण होईल व त्यानंतर विजेते जाहीर केले जातील असे विज्ञान शिक्षण आणि संप्रेषण केंद्राचे समन्वयक प्रा.रा.ल.देवपूरकर यांनी सांगितले.(Pune News) विजेत्या स्पर्धकांना एक ते पाच हजाराची बक्षिसे देखील देण्यात येणार आहेत असेही ते म्हणाले. यावबाबतची अधिक माहिती विद्यार्थ्यांना http://sciencepark.unipune.ac.in या संकेस्थळावर मिळेल.

याचे बक्षीस वितरण महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित चे (एमकेसीएल) संचालक डॉ.विवेक सावंत, विद्यापीठाचे प्र- कुलगुरू डॉ.संजीव सोनवणे आणि कुलसचिव डॉ.प्रफुल्ल पवार यांच्या उपस्थितीत होणार आहे, असेही देवपूरकर यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.