Pune : ऑर्बिटल इलेक्ट्रोमेकला प्रतिष्ठेचा गो. स. पारखे इनोव्हेशन पुरस्कार प्रदान

एमपीसी न्यूज : उद्योगजगतात नवनवे प्रयोग करणाऱ्या आणि गरुडझेप घेणाऱ्या उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चरतर्फे देण्यात येणारे विविध पुरस्कार आज प्रदान करण्यात आले. यामध्ये प्रतिष्ठेचा मानला जाणारा गो. स. पारखे इनोव्हेशन पुरस्कार ऑर्बिटल इलेक्ट्रोमेक या कंपनीला प्रदान करण्यात आला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यपीठाचे कुलगुरू  नितीन करमाळकर यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. 

यावेळी मराठा चेंबर ऑफ कॉमर्सचे महासंचालक डॉ. अनंत सरदेशमुख , डिक्कीचे संस्थापक मिलिंद कांबळे आदी मान्यवर  उपस्थित होते

नवीन उत्पादन व डिझाइनसाठी देण्यात येणारा हरि मालिनी जोशी पुरस्कार योगीराज गदो यांना देण्यात आला. अमाल्गम इंजिनीअरिंगच्या अमाल्गम बायोटेक या कंपनीला, तसेच डायनॅमिक इंजिनीअरिंग सोल्यूशन्स या कंपनीलाही हा पुरस्कार आला. मुंबईच्या पी. एन. सेफ्टी इंडस्ट्रीज या कंपनीलाही या पुरस्काराने सन्मानित केले गेले. महिला इटरप्रिनरसाठी दिला जाणारा रमाबाई जोशी पुरस्कार सरल प्री-कास्ट सोल्यूशन्स कंपनीच्या भागीदार संपदा वायचळ यांना प्रदान करण्यात आला.

आज ( गुरुवार ) पुण्यातील पुण्यातील टिळक स्मारक मंदिर येथे हा पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम पार पडला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.