Pimpri : रुग्णाच्या जीवाशी खेळणा-या दोषी डॉक्टरांवर कडक कारवाईचे आदेश द्या

मनसे व विरोधी पक्षनेते दत्ता साने यांची वैद्यकीय अधिका-यांकडे मागणी 

एमपीसी न्यूज – महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील डॉक्टरांनी चुकीचे उपचार केल्याचा गंभीर प्रकार रुग्णांच्या नातेवाईकांनी केला आहे. एका तरुणाच्या दोन्ही किडन्या व्यवस्थित असताना देखील डॉक्टरांनी त्यावर डायलिसिसची प्रक्रिया केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. त्या रुग्णाच्या दोन्ही किडन्या उत्तम असतानाही काही कारण नसताना त्याचे डायलिसिस केले गेले. ही बाब अतिशय गंभीर आणि आपल्याकरिता शरमेची आहे. रुग्णाच्या जीवाशी खेळणाऱ्या दोषी डॉक्टरांना खुलासा देण्याची कोणत्याही प्रकारची संधी न देता त्वरित निलंबनाची कडक कारवाई करावी. झालेला प्रकार हा अतिशय दुर्दैवी असून यावर लगेच कारवाई करून पुन्हा असा प्रकार घडणार नाही याची दक्षता आपण घ्यावी. व त्वरीत कारवाई करण्याचे आदेश दयावेत. हलगर्जीपणा करणा-या डॉक्टरांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मनसे व विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी वायसीएम रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी यांच्याकडे केली आहे.

दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, सांधे दुखी आणि तापामुळे वेताळनगरमधील आनंद अनिवाल हा आपल्या रुग्णालयात दाखल झाला असता त्याच्या विविध तपासण्या केल्या गेल्या. त्यामध्ये ब्रिटेनिनचे प्रमाण सुमारे २४ असल्याचे दाखविण्यात आले. हे प्रमाण जास्त असल्याने त्याच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्याचे निदान डॉक्टरने केले. तसेच त्वरित डायलेसिस करण्याची गरज असल्याचे त्याच्या नातेवाईकांना सांगितले.  तोपर्यंत त्या रुग्णाचे पुन्हा रक्त घेऊन ते तपासणीकरिता पाठविले, त्याचाही अहवाल आला. परंतु तो अहवाल न पाहताच डॉक्टरांनी डायलेसिस देखील केले संबंधीत नातेवाइकांनी खाजगी रुग्णालयातून अहवाल आणला. तसेच आपल्या रुग्णालयातील दुसरा अहवाल पहिला असता त्यामध्ये चक्क  ब्रिटेनिनचे प्रमाण सामान्य दाखविले गेले. म्हणजेच त्या रुग्णाच्या दोन्ही किडन्या उत्तम असतानाही काही कारण नसताना त्याचे डायलिसिसकेले गेले. ही बाब अतिशय गंभीर आणि आपल्याकरिता शरमेची आहे.

वास्तविक पाहता डॉक्टरांनी नंतर आलेला तपासणी अहवाल आधी पाहायला हवा होता.  त्यानंतरच पुढील कार्यवाही करण्याची गरज होती. डॉक्टरांना रुग्ण देव म्हणत असताना अशी घोडचूक झालीच कशी ??? दूसरा तपासणी अहवाल का डॉक्टरांनी का नाही पाहिला? ? ज्या  डॉक्टरांकडून ही गंभीर चूक  झालेली आहे. त्यांनी केवळ माफी मागितली. परंतु डॉक्टरांच्या अशा प्रकारच्या कामकाजामुळे रुग्णालयातील इतर रुग्ण डॉक्टर वर  विश्वास ठेवतील का ? ? तसेच ज्या मशीनमधून आधी ब्रिटेनिनचे प्रमाण जास्त असल्याचे दिसून आले ती मशीन चांगली आहे का ?? आणि जर ती मशीन चांगली असेल तर अहवाल चुकीचा कसा काय आला??

या सर्व गोष्टीमुळे त्या रुग्णावर तसेच त्याच्या नातेवाईकांवर काय प्रसंग ओढावला असेल त्याची कल्पना आपण केली का? आपल्या रुग्णालयातील अशा बेजबादारपणे काम करणाऱ्या तसेच रुग्णाच्या जीवाशी खेळणाऱ्या दोषी डॉक्टरांना खुलासा देण्याची कोणत्याही प्रकारची संधी न देता त्वरित निलंबनाची कडकं कारवाई करावी. झालेला प्रकार हा अतिशय दुर्दैवी असून यावर लगेच कारवाई करून पुन्हा असा प्रकार घडणार नाही याची दक्षता घ्यावी. व त्वरीत कारवाई करण्याचे आदेश दयावेत.

विरोधी पक्षनेते दत्ता साने,  मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले,  महिला सेना अध्यक्ष अश्विनी बांगर,  जनहित कक्षाचे अध्यक्ष राजु भालेराव, सचिव मनसेचे रुपेश पटेकर व सीमा बेलापूरकर, विभाग अध्यक्ष विशाल मानकरी,  दत्ता देवतरासे, संजय दादा यादव, उपशहर अध्यक्ष स्नेहल बांगर व   अनिता पांजाळ, महिला सेना अनिता नाईक,  शहर संघटक सुशांत साळवी, भोसरी विधानसभा उपाध्यक्ष सचिन मिरपगार,  पिंपरी विधानसभा उपविभाग अध्यक्ष  मिलिंद के सोनवणे, विद्यार्थी सेनेचे विकास कदम, भाग्यश्री चिंचोले, स्वप्नील मंहागरे, आकाश पांचाळ, गणेश वाघमारे, प्रदीप घोडके उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.