Pune News : ऑनलाईन मद्याची ऑर्डर पडली महागात, नामांकित डॉक्टरला तीन लाखाचा गंडा

एमपीसी न्यूज : ऑनलाईन मद्याची ऑर्डर करणे एका नामांकित डॉक्टरला चांगलेच महागात पडले आहे. सायबर चोरट्यांनी या डॉक्टरच्या बँक खात्यातून तब्बल सव्वा तीन लाख रुपये लंपास केले आहेत.

याप्रकरणी एका 71 वर्षोय डॉक्टरांनी तक्रार दिली असून चतुश्रुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन अनोळखी मोबाईल धारकाविरोधात हा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार एप्रिल महिन्यात घडला आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी हे नामांकित डॉक्टर असून बालेवाडीत राहतात. एप्रिल महिन्यात ते शिवाजीनगर परिसरात असताना त्यांनी ओळखीच्याच एका वाइन शॉपवरून रेडवाईन मागवली होती. त्यावेळी अज्ञात आरोपींनी त्यांना वाईन्स देण्यासाठी क्यूआरकोड पाठवून त्यांच्या खात्यातून 3 लाख 16 हजार 168 रुपये घेऊन त्यांची फसवणूक केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.