PMPML : पीएमपीएमएलच्यावतीने आरोग्य शिबिराचे आयोजन

एमपीसी न्यूज – पुणे महानगर परिवहन ( PMPML ) च्या वतीने पीएमपीएमएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मीनारायण मिश्रा , सहव्यवस्थापकिय संचालक डॉ.चेतना केरूरे, जनरल मॅनेजर सुबोध मेडसीकर, वाहतुक व्यवस्थापक दत्तात्रय झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी मुख्यालय क्रमांक 2चे प्रमुख सुनिल दिवाणजी यांनी सोमवारी  (दि.२५) व मंगळवारी (दि.२६) दोन दिवस आरोग्य चिकिस्ता शिबिर राबविण्यात आले होते.

 

 

या दोन दिवस चाललेल्या ” देसाई नेत्र रुग्णालय ” हडपसर यांच्या वतीने पीएमपीएमएलचे चेकर, स्टार्टर, वाहक, चालक व अॉफीसमधील सर्व कर्मचारी मिळून 105  जणांचे डोळे तपासणी, बीपी, डायबेटीस व अन्य आजारावर मोफत तपासणी करण्यात आली होती.

 

 

 

 

आजच्या दिनी धगधगत्या वातावरण व प्रदुषणामुळे हार्टटॅक, डायबेटीस, बीपी, अंधत्व व अन्य आजार भरपूर वाढले आहेत. आपले जग व आपला देश नुकताच आता कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल करीत आहे म्हणून पीएमपीएमएल व पिंपरी मुख्यालय क्रमांक 2 च्या तसेच देसाई नेत्र रूग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने शिबीर आयोजीत करण्यात आले होते.

 

शिबीर यशस्वी करण्यासाठी अॅसिस्टंट ट्रॉफीक इन्स्पेक्टर शिलरत्न बाणे, वाहतुक नियंत्रक संदीपान साबळे, गुणवंत कामगार काळुराम लांडगे व पिंपरी मुख्यालय क्रमांक २ चे सर्व कामगारांनी परीश्रम घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.