Talegaon : तळेगावमध्ये दहा दिवसीय संस्कृत संभाषण वर्गाचे आयोजन

एमपीसी न्यूज – तळेगाव (Talegaon) दाभाडे येथे मुलांसाठी दहा दिवसीय संस्कृत संभाषण वर्गाचे आयोजन केले आहे. ज्यात इच्चुक विनामुल्य प्रवेश मिळवू शकतात.या वर्गाचे आयोजन संस्कृत भारती मावळ (मावळ प्रांत) व ब्राम्हण सेवा संघ तसेच सरस्वती विद्या मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत केले आहेत.

Mahavitaran : धार्मिक स्थळांसाठी वीजदराबाबतचा तो संदेश खोटा – महावितरण

या संस्कृत संभाषण वर्गात 12 वर्षा पुढील मुलांना विनामुल्य प्रवेश घेता येणार आहे. हे वर्ग तळेगाव (Talegaon) दाभाडे येथील सरस्वती विद्या मंदिर या प्रशालेत 1 जून ते 11 जून 2023 या कालावधीत सकाळी दहा ते दुपारी बारा या वेळेत भरणार आहेत.

यात मुलांना संस्कृत भाषेचे पुर्व ज्ञान नसले तरी चालेल. संस्कृत ही सोपी भाषा असून त्याचा प्रचार-प्रसार व्हावा या उद्देशाने हे वर्ग आयोजीत केले आहेत. तरी इच्छुकांना दिलीप कुलकर्णी – 9764072829 , मंजुषा तेलंग – 9922597237, प्रकाशराव जोशी – 9763860189, ज्योती मुंगी – 7709518268, वसुधा साठे – 9423589865 या क्रमांकावर अधिक माहिती घेता येणार असून येथे नाव नोंदणी देखील करता येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.