Pune News : कोविड काळात समाजकार्य करणाऱ्या संस्थांना मानपत्र

एमपीसी न्यूज – कोविडच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेनंतर शहरात गंभीर स्थिती निर्माण झाली होती. या स्थितीत पुणेकरांच्या मदतीला सरसावलेल्या सेवाभावी संस्था, मंडळे, धार्मिक संस्थांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी महापालिकेच्या वतीने मानपत्र देऊन गौरव करण्यास स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

रासने म्हणाले, ‘कोरोनामुळे निर्माण झालेल्य परिस्थितीत मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्त हानी झाली. वैद्यकीय यंत्रणांवर मोठा ताण आला होता. गरजवंतांना अन्न मिळत नव्हते. रुग्णालयात बेडस शिल्लक नव्हते. अंत्यविधीसाठी जागा उपलब्ध होत नव्हती. अशा वेळी सेवाभावी वृत्तीने विविध संस्था धावून आल्या. वैद्यकीय यंत्रणांवरील ताण कमी करण्यासाठी जीव धोक्यात घालून मदत केली. अन्नधान्याचे वाटप केले, रुग्णालयांना ऑक्सिजन सिलेंडर पुरविले, विलगीकरण कक्ष उभारले, जनजागृती केली. अशा सुमारे तीन हजार संस्थांचा मानपत्र देऊन कृतज्ञतापूर्वक गौरव करण्यात येणार आहे.’

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.