Pune : छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त मिरवणूक सजावट स्पर्धा आयोजित करा – शिवसेना

एमपीसी न्यूज – छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सवानिमित्त मिरवणूक सजावट स्पर्धा आयोजित करण्याची मागणी शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे यांनी केली आहे. या संदर्भातील निवेदन महापौर, आयुक्तांना देण्यात आले आहे.

यावेळी उपप्रमुख पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघ अभय वाघमारे, विभाग प्रमुख सोमनाथ खांदवे, राहुल जेकटे, अनिल दामजी, ओंकार जगताप, राजेश मोरे, सनी गवते उपस्थित होते.

शिवाजी महाराजांची जयंती तारखेनुसार 19 फेब्रुवारी आणि तिथीनुसार 12 मार्च रोजी पुणे शहरात साजरी केली जाते. महाराजांचा इतिहास भावी पिढीला माहिती व्हावा व प्रेरणा मिळावी, या उद्देशाने सार्वजनिक मंडळे, संघटना, प्रतिष्ठान व राजकीय पक्ष मिरवणुका काढून ऐतिहासिक व जिवंत देखावे सादर करतात.

काही वर्षांपूर्वी पुणे महापालिकेतर्फे या देखाव्याच्या व मिरवणुकीच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत होते. नामांकनानुसार देखाव्यांना रोख पारितोषिक व सन्मानचिन्ह महापौर यांच्या हस्ते प्रदान करण्यात येत होते. परंतु, या स्पर्धेला खंड पडला असून, या स्पर्धा पुन्हा आयोजित केल्यास शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यास प्रोत्साहन मिळेल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.