Thergaon news: थेरगाव सोशल फाऊंडेशनच्यावतीने महारक्तदान शिबिराचे आयोजन

एमपीसी न्यूज : रविवार 27 नोव्हेंबर रोजी 26/11 शहिदांना श्रद्धांजली व संविधान दिनाचे औचित्य साधुन तसेच वाढत्या डेंगु रोगामुळे शहरात सध्या जो रक्ताचा तुटवडा झाला आहे, तो लक्षात घेता थेरगाव सोशल फाउंडेशनच्या वतीने महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

शहरामध्ये डेंगू व मलेरियाचे मोठे संख्येने रुग्ण असल्याने त्याने रक्तातील आरपीडी आणि एसपीडी सारख्या घटकांची गरज असते. एक रक्ताच्या पिशवीतून अगदी तुरळक आरपीडी आणि एसपीडी घटक मिळतात. त्यामुळे चार रक्त पिशव्यातील घटक एकत्र करण्याची गरज असते एकत्र करण्याची आवश्यकता असते. हे शिबिर गणेश मंदिर, मयुरबाग कॉलनी, गणेश नगर या ठिकाणी थेरगाव मध्ये घेण्यात आले होते.

Pune News : पुण्यातील चांदणी चौकाजवळ बसला भीषण आग

या महाशिबिरामध्ये थेरगाव तसेच पिंपरी चिंचवड शहरातील नागरीकांनी, विद्यार्थी, महीलांनी तसेच पोलिस अधिकारी, पत्रकार मंडळींनी मोठ्या प्रमाणावर भाग घेतला होता. त्यामुळे विक्रमी 196 रक्तपेशव्यांचे संकलन करण्यात आले होते. यावेळी अनेक सामाजिक राजकिय क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींनी यावेळी रक्तदान शिबिराला भेट दिली. सर्व रक्तदात्यांचे थेरगाव सोशल फाऊंडेशन तर्फे आभार मानण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.