Pune News : ‘लता के रंग’ कार्यक्रमाचे 7 डिसेंबर रोजी आयोजन

एमपीसी न्यूज: भारतरत्न लता मंगेशकर यांच्यासमवेत 30 पार्श्वगायकांनी गायलेल्या अजरामर गीतांचा कार्यक्रम 7 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता पुण्यात रसिकांच्या भेटीस येत आहे.

Pune News: आर्यन खानच्या निर्दोष मुक्ततेला हिंदू महासंघाकडून न्यायालयात आव्हान

ऱ्हीदम एंटरटेनमेंट प्रस्तुत हा कार्यक्रम बालगंधर्व रंगमंदिर येथे होणार आहे. आरती दीक्षित, राजाभाऊ तिखे, मिनाक्षी गायकवाड, मिलिंद जोशी, प्रसाद केळकर हे कार्यक्रम सादर करणार आहेत. क्रांती शहा ह्या कार्यक्रमाचे निवेदन करणार आहेत. ध्वनी व्यवस्था अमोल कोळेकर यांची आहे. तर ह्या कार्यक्रमाच्या देणगी प्रवेशिका बालगंधर्व रंगमंदिर येथे उपलब्ध आहेत.

तलत महमूद ते उदित नारायण अशा 30 पार्श्वगायकांनी लता मंगेशकर यांच्यासमवेत गायलेल्या गीतांचा नजराणा या निमित्ताने रसिकांना अनुभवायला मिळणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.