Pune : शिक्षकांसाठी “इनोव्हेटिव्हटीचिंग अँड लर्निंग थ्रू टेक्नॉलॉजी”वर राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

एसएसपीयु आणि एससीडीएलच्या पुढाकारातून

एमपीसी न्यूज़- गेल्या काही वर्षात शैक्षणिक क्षेत्रात अमूलाग्र बदल आढळून येत आहेत. परिणामतः बदलेले नवीन शैक्षणिक धोरण, बदलेल्या शिकवण्याच्या पद्धती, ऑनलाईन लेक्चर्स आणि डिजिटल यंत्रणांचा वापर अशा महत्वपूर्ण बदलांना शिक्षकांना सामोरे जावे लागत आहे.

Pune : खडकी रेल्वे स्टेशन जंक्शन येथील अतिक्रमणाबाबत संयुक्तपणे कारवाई करा : जिल्हाधिकारी राजेश देशमुख

हा बदल स्वीकारताना शिक्षकांना बऱ्याच अडीअडचणींचा सामना करावा लागत आहे आणि तो बदल सहज सोपा होण्यासाठी एसएसपीयु आणि एससीडीएलतर्फे ‘इनोव्हेटिव्ह टीचिंग अँड लर्निंग थ्रूटेक्नॉलॉजी, पुणे (Pune) या विषयावर एक दिवशीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात येत आहे.

महाराष्ट्रातील पहिले कौशल्य आधारित विद्यापीठ एसएसपीयु आणि देशातील अग्रेसर दूरस्थ शिक्षण देणारी एससीडीएल ही राष्ट्रीय परिषद येत्या ३ जून २०२३ रोजी एसएसपीयुच्या परिसरात (Pune) आयोजित करत आहे. ह्या परिषदेमध्ये विविध चर्चासत्रे, परिसंवाद, कौशल्य कार्यशाळेच्या माध्यमातून उपस्थितांना मार्गदर्शनकरण्यात येईल. ह्या परिषदेअंतर्गत शैक्षणिक क्षेत्रात नव्याने उदयास येत असलेल्या संकल्पनांवर भर देण्यात येईल.

यामार्फ़त शिक्षकांना टीचिंग अँड लर्निंग च्या संदर्भात नवीन संकल्पना रुजू होण्यास मदत होईल. तंत्रज्ञानाद्वारे नाविन्यपूर्ण शिकवणे आणि शिकणे या संकल्पनेवरआधारित ह्या परिषदेमध्ये शिक्षणातील अध्यपन निष्पत्ती (लर्निंग हाव्हू टू लर्न इन आउटकम बेस्ड एज्युकेशन) आणि कौशल्य विकासासाठी नाविन्यपूर्ण प्रशिक्षण धोरण (इनोवेटिव्ह स्टार्टरजीस फॉर स्किल डेव्हलपमेंट अँड ट्रेनिंग) या विषयांवर चर्चासत्रांचे आयोजन करण्यात येणार आहे.

त्याचप्रमाणे उपस्थितांना करिअरसाठी आवश्यक असणाऱ्या महत्वपूर्ण कौशल्यांबाबत परिसंवादातून मार्गदर्शन करण्यात येईल. ह्या परिषदेमध्ये अध्यापन-शिक्षणाततंत्रज्ञान आणि ऑनलाइन संसाधनांचा वापर ह्यावर कार्यशाळेच्या माध्यमातून प्रकाश टाकण्यात येईल. व्हर्च्युअल क्लासेस कसे आयोजित करावे, शिकण्याच्या आणि शिकवण्याच्या प्रक्रियेमध्ये आयसीटी साधनांचा वापर कसा करावा, मुक्त शैक्षणिक संसाधने अशा विविध विषयांवर सुद्धा चर्चा घडवण्यात येईल.

तसेच ही परिषद उपस्थितांना नेटवर्किंग, उद्योग क्षेत्रातील तज्ञांना भेटण्याची, कल्पनांची देवाणघेवाण करण्याची आणि नवीन गोष्टी शिकण्याची अशा अनेक उत्तमसंधी प्राप्त करून देत आहे. ह्या परिषदेमध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी कृपया https://forms.gle/H3ptm1Yanr2WhYjL6 या संकेतस्थळावर नावनोंदणी करावी.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.