Pune News: पुणे येथे रेल पोस्ट गति शक्ती एक्सप्रेस कार्गो मार्केटिंग मीटचे आयोजन

एमपीसी न्यूज : रेल्वे आणि पोस्ट विभागाच्या संयुक्त प्रयत्नातून, पार्सलसारख्या वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवण्याच्या उद्देशाने पुणे येथील विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालयात गुरुवारी एका मार्केटिंग मीटचे आयोजन करण्यात आले.

बैठकीच्या अध्यक्षस्थानी रेल्वे बोर्ड मधील कार्यकारी संचालक (स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग आणि इम्प्लीमेंटेशन) जी.व्ही.एल. सत्यकुमार तसेच पुणे विभागाचे पोस्टमास्टर जनरल रामचंद्र जायभाय आणि विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्रीमती इंदू राणी दुबे यांची प्रमुख उपस्थिती होती. वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. मिलिंद हिरवे यांनी सूत्रसंचालन केले. बैठकीत कॉर्पोरेट, एमआईडीसी, एपीएमसी, चेंबर ऑफ कॉमर्स आणि लॉजिस्टिक्स क्षेत्रातील प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले.

बैठकीदरम्यान कार्यकारी संचालकांनी पीपीटीच्या माध्यमातून या पार्सल सेवेचे सविस्तर सादरीकरण केले आणि सांगितले की, रेल्वेकडून या प्रकारची कार्गो सेवा सुरत ते बनारस दरम्यान गेल्या महिन्यात सुरू करण्यात आली आहे. रेल्वेचा हा प्रयत्न आहे की अशा प्रकारची पार्सल सेवा पोस्ट आणि रेल्वे विभागाच्या मार्केटिंग आणि पार्सल विभागाच्या टीम द्वारे नवीन क्षेत्र शोधून ही योजना कशी यशस्वी करता येईल यावर चर्चा करण्यात आली.

Pune News: पीएमपीएमएलच्या सेवेतून सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सत्कार

सत्यकुमार यांनी आवाहन केले की लोकांना त्यांचे उत्पादन इत्यादी वस्तू पाठवण्यासाठी कस्टमाइज बॉक्स, ट्रॉली इत्यादी पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत त्यासाठी पुणे व परिसरातून रेल्वे पार्सल सेवा उपलब्ध करून देता येईल. बैठकीत उपस्थित प्रतिनिधींनी आपले विविध मुद्दे, सूचना व मागण्या सविस्तरपणे मांडल्या ज्यावर काम करून योग्य समाधान करण्याबद्दल सांगण्यात आले.

बैठकीला संबोधित करताना पोस्टमास्तर जनरल श्री रामचंद्र जायभाय यांनी टपाल विभागाकडून योग्य ते सहकार्य व सल्ला देण्याचे आश्वासन दिले तसेच विभागीय रेल्वे व्यवस्थापक इंदू राणी दुबे यांनीही प्रतिनिधींनी उपस्थित केलेल्या समस्या व प्रश्नांवर समन्वय साधून योग्य तो निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आणि सांगितले की आमची मार्केटिंग टीम यामध्ये पूर्ण सहकार्य व मार्गदर्शन करेल.

बैठकीला वरिष्ठ विभागीय यांत्रिक इंजीनियर विजयसिंह दडस, जोएल मॅकेन्झी, वरिष्ठ विभागीय सामग्री व्यवस्थापक विनोदकुमार मीणा, सहायक वाणिज्य प्रबंधक अजय कुमार, पुणे विभागाचे जनसंपर्क अधिकारी मनोज झंवर यांच्यासहीत अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.आभार विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. रामदास भिसे यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.