Pimpri : मोफत तपासणी शिबिराचे आयोजन    

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने चिंचवड येथील कामगार कल्याण केंद्रात कामगार व  कुटुंबियांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या शिबिराचे उद्‌घाटन समाजसेविका शारदा मुंडे व गगनगिरी विश्व फाउंडेशनच्या अध्यक्षा रेखा भोळे यांच्या हस्ते झाले. डॉ. किरण जोशी, डॉ. पायल ठोंगे, डॉ. निखील राक्षे, डॉ. कोमल कदम, डॉ. नीरजकुमार पाटील आदी उपस्थित होते.

या शिबिरात 110 जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली. डॉ. किरण जोशी यांनी मार्गदर्शन केले. सुभाष चव्हाण, सुदाम शिंदे, सोमनाथ पतंगे, शंकर पाटील विनोद सुर्वे, मच्छिंद्र कदम, संदीप रांगोळे, शिवाजी पाटील, जयेंद्र मुजुमकर, इंद्रजित चव्हाण आदी उपस्थित होते. रुपाली मुळीक, माया कदम, गौरी सरोदे, विभावरी इंगळे यांनी संयोजन केले. बाळासाहेब गायकवाड यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.