Talegaon Dabhade : भगवान महावीर जयंती निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन

एमपीसी न्यूज : तळेगाव दाभाडे येथे भगवान महावीर जयंती निमित्त जैन सोशल ग्रुपच्या वतीने (दि 25) रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.  त्यावेळी 60 रक्तदात्यांनी रक्तदान केले.

शिबिराचे उद्घाटन तळेगाव दाभाडे पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भास्कर जाधव व शहाजी पवार यांच्या हस्ते झाले. जिओ और जिने दो चा संदेश देणारे भगवान महावीर यांच्या जन्म कल्याण दिनानिमित्त रक्तदान सारखा स्तुत्य उपक्रम आयोजित केल्याबद्दल आयोजकांचे कौतुक केले.

1998 सालापासून सातत्य राखून हा उपक्रम आयोजित केल्याबद्दल जीरावाला ट्रस्टचे मुख्य विश्वस्त अनिल मेहता यांनी अभिनंदन केले. जैन भवन येथे सकाळी दहा ते दोन या वेळात हा कार्यक्रम करण्यात आला कार्यक्रमास प्रमुख पाहुणे विश्वस्त भवर मल संघवी दिनेशभाई वाडेकर रमेश निंबजीया हे उपस्थित होते.

कार्यक्रमास पुणे जिल्हा भाजपचे अध्यक्ष गणेश भेगडे, उपनगराध्यक्ष सुशील सैंदाणे, दिलीप पारेख, दीपक फल्ले, नगरसेवक संतोष दाभाडे, अमोल शेटे, गटनेते अरुण भेगडे पाटील, माजी नगरसेवक इंद्रकुमार ओसवाल, राजेंद्र जांभूळकर, प्रकाश ओसवाल यांनी भेट दिली.

प्रथम रक्तदान करणाऱ्या सोळा जणांना चांदीचा शिक्का ‘ धन गोल्ड ‘ तर्फे भेट म्हणून देण्यात आला. महावीर जयंतीनिमित्त आज शहरातील ठिकठिकाणी गोरगरिबांसाठी अन्नदानाचा व प्रसादाचा कार्यक्रम जीरावाला टेम्पल ट्रस्टच्या वतीने घेण्यात आला.

कार्यक्रमाचे स्वागत संजय अमृतलाल ओसवाल यांनी केले सूत्रसंचालन किरण ओसवाल यांनी केले आभार राकेश ओसवाल यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी घनश्याम राठोड, नीलेश जैन, विनोद राठोड ,इंदर ओसवाल ,समीर ओसवाल, भरत राठोड यांनी प्रयत्न केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.