Talegaon Dabhade News : तळेगावमध्ये प्रथमच बालजत्रा व मनोरंजन नगरीचे आयोजन

एमपीसी न्यूज – मावळचे आमदार सुनिल शेळके यांच्या वतीने तळेगाव दाभाडे शहरात प्रथमच भव्यदिव्य स्वरुपात सर्वांसाठी मोफत ‘बालजत्रा व मनोरंजन नगरीचे आयोजन करण्यात आले आहे. ही बालजत्रा गुरुवार (दि. 26) ते रविवार (दि. 29) सायंकाळी 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत मायमर मेडिकल कॉलेज ग्राऊंड, जनरल हॉस्पिटल जवळ तळेगाव दाभाडे येथे होणार आहे. सर्वांनी बालगोपाळांसमवेत सहकुटुंब या आनंदोत्सवात सहभागी व्हावे असे आवाहन मावळचे आमदार सुनिल शेळके यांनी केले आहे.

कुटुंबातील प्रत्येकासाठी मनोरंजन, विविध खेळणी, कार्टुन ट्रेन, बलून शुटींग, डान्स शो, मर्दानी खेळ, मॅजिक शो, महिलांसाठी लकी ड्रॉ व आकर्षक बक्षिसे मिकी माऊससह अनेक कार्टुन्स, म्युझिक धमाल, मस्ती, मनोरंजन आणि सेलिब्रिटी अँकर RJ अक्षय आदी बालजत्रा व मनोरंजन नगरी मधील सर्व खेळणी मोफत आहेत.

कोरोनाच्या काळात दोन वर्षे मुलांना खेळांचा, यात्रांचा मनसोक्त आनंद घेता आला नाही.सध्या मुलांच्या शाळेला सुट्टी असल्याने ही गरज ओळखून बालजत्रा व मनोरंजन नगरीचे आयोजन केल्याने लहानमुलांसह कुटुंबातील सर्वांचेच मनोरंजन होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.