BJP : भाजपच्या वतीने क्रिकेट सामन्याचे आयोजन; सर्व पदाधिकाऱ्यांना एकत्र येण्याची संधी

एमपीसी न्यूज – भारतीय जनता पार्टी पुणे शहराच्या वतीने (BJP) शहरातील सर्व मतदार संघांचे क्रिकेटचे सामने संपन्न झाले. सर्व पदाधिकाऱ्यांनी खेळाच्या माध्यमातून एकत्र यावे व एकमेकांची मैत्री आधीक दृढ व्हावी, हा या स्पर्धेच्या आयोजनामागचा हेतू होता.

या स्पर्धेचे उद्घाटन भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, शहराध्यक्ष धीरज घाटे, सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

कसबा मतदारसंघातील नवनियुक्त प्रमुख पदाधिकारी यांच्यासाठीच्या सुपर वॉरिअर विषयातील बैठकीसाठी उपस्थित राहून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पनेतील सुपर वॉरियर या विषयाबद्दल सबंधपणे विश्लेषन केले, अशी माहिती भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी दिली. यावेळी कसबा निवडणूक प्रमुख हेमंत रासने उपस्थित होते.

Pune : पदवीधारक अधिकाऱ्यांना राष्ट्रीय सुरक्षेसाठी आव्हानांचा सामना करावा लागतो – लष्करप्रमुख मनोज पांडे

दरम्यान आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपातर्फे विविध (BJP) मतदारसंघात नियुक्त्या करण्यात येत आहे. पुणे शहर भारतीय जनता पार्टी वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाच्या नवनिर्वाचित पदनियुक्ती आणि सर्वात प्रथम वेबसाईट प्रक्षेपण कार्यक्रमास माजी आमदार जगदीश मुळीक यांच्यासोबत उपस्थित राहून सबंध नवनियुक्त पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून वडगावशेरी मतदारसंघात ताकद निर्माण करण्यात येणार आहे.

पक्षातील पदाधिकाऱ्यांना वेळोवेळी विविध जबाबदारी आणि पदे देत त्यांच्या कार्यशक्तीला संधी देण्याचे काम भारतीय जनता पक्ष करत असतो. त्यानुसार भाजप महिला मोर्चा- पुणे शहराची नवीन कार्यकारणी नुकतीच जाहीर झाली, अशी माहिती महिला मोर्चा अध्यक्षा चित्रा वाघ यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.