Pimpri : मूळव्याध व इतर व्याधींची मोफत तपासणी शिबीराचे आयोजन

एमपीसी न्यूज – चिंचवड हिलिंग हॅन्डस क्लिनिक प्रिमियर प्लाझा येथे विजयादशमी निमित्त दि 18 ते 25 ऑक्टोबर दरम्यान ही तपासणी होणार आहे. या तपासणी शिबिराची वेळ सकाळी अकरा ते रात्री आठ पर्यंत असून मूळव्याध व इतर व्याधींची मोफत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये मूळव्याध, बद्धकोष्ठता, भगंदर, फिशर, हर्निया, हायड्रोसिल, पायलोनीडल सायनस, वेरिकॉजव्हेन्स व व्हेरिकोज अल्सर तसेच कमरेखालील आजार इ. ची मोफत तपासणी करण्यात येणार आहे. वरील आजारांपासून रुग्णांना कायमची मुक्तता मिळावी हाच या शिबिराचा उद्देश आहे.

_MPC_DIR_MPU_II

या रुग्णालयामध्ये आवश्यकता असल्यास अत्याधुनिक पद्धतीने वरील आजारांवर स्टार सर्जरीने व थ्री डी मेश रिपेअर आणि लेझर द्वारे उपचार केले जातील ज्याने वेदना व रक्तस्त्राव न होता वरील आजार पुन्हा उद्भवत नाही तसेच दैनंदिन काम करताना कोणताही अडथळा येत नाही .

दि. 18 ते 25 ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या या शिबिरात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन हिलिंग हॅन्डस क्लिनिकचे जनरल सर्जन डॉ. चैतन्य शहा व डॉ. अश्विन पोरवाल यांनी केले आहे. अधिक माहिती साठी संपर्क 8888200004/3/6/7

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.