Pimple Saudagar : राष्ट्रवादीचे नेते नाना काटे यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत शस्त्रक्रिया व आरोग्य शिबिराचे आयोजन

एमपीसी न्यूज – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नगरसेवक विठ्ठल ऊर्फ नाना काटे यांच्या वाढदिवसानिमित्त चिंचवड विधानसभा मतदारसंघात मोफत शस्त्रक्रिया आणि आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. थेरगाव, गुजरनगर येथील लक्ष्मीबाई बारणे उद्यानात वाकड, गणेशनगर आणि थेरगाव भागातील नागरिकांसाठी रविवारी (दि. 12) हे शिबीर घेण्यात आले. त्यामध्ये 250 हून अधिक नागरिकांची मोफत तपासणी करण्यात आली.

या आरोग्य शिबीरात गरीब व गरजूंची मोतीबिंदू, मणका, हृदयरोग, कर्करोगासंबंधित आजारांची मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. तसेच हाडे, ईसीजी, रक्तदाब, शुगर, त्वचा, मानसिक आरोग्य, व्यसनमुक्ती विषयीच्या तपासणी व रोग निदान करण्यात येणार आहेत.

वाकड, गणेशनगर, थेरगाव भागातील नागरिकांसाठी थेरगाव, गुजरनगर येथील लक्ष्मीबाई बारणे उद्यानात रविवारी शिबीर घेण्यात आले. यावेळी नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, नगरसेवक मयूर कलाटे, विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष सुनिल गव्हाणे, महिला प्रभाग अध्यक्षा सुप्रिया गव्हाणे, माजी स्वीकॄत सदस्य गोरक्षनाथ पाषाणकर, विद्यार्थी संघटनेचे कार्याध्यक्ष उमेश काटे, विशाल काळभोर, माजी नगरसेवक निलेश पांढरकर, विशाल पवार, प्रशांत सपकाळ आदी उपस्थित होते. या शिबिरात सुमारे अडीचशे नागरीकांची मोफत तपासणी करण्यात आली.

_MPC_DIR_MPU_II

या कार्यक्रमाचे आयोजन विशाल वाकडकर, सुनिल गव्हाणे, गोरक्षनाथ पाषाणकर, संतोष गोडांबे, अक्षय शेडगे, विशाल झुंबरे, जुबेर शेख, किशोर पाटोळे, चेतन विटकर, धैर्यशील धर्मे व पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने करण्यात आले.

थेरगाव येथील पडवळनगरमध्ये दुसरे आरोग्य शिबीर घेण्यात आले. त्याचे आयोजन आयोजन सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर महाराज ववले, विशाल काळे, सागर खवळे यांनी केले. या शिबिरात साडे चारशेहून अधिक नागरिकांची मोफत तपासणी करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.