Pimpari News : नेहरूनगर आगाराच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

एमपीसी न्यूज ;   नेहरूनगर ( पिंपरी )आगार येथे पिंपरी आगार व मुख्यालय क्र. 2 यांचे वतीने भव्य रक्तदान शिबिर रविवारी सकाळी ०९.०० ते सायंकाळी ०५.०० यावेळेत पार पडले. PMPML चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली ह्या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

सदर शिबीरात संजीवनी ब्लड बॅंक यांचेकडे 228 रक्तदात्यांनी रक्तदान केले तर डॉ. डि.वाय.पाटील ब्लड बँक यांचेकडे 193 असे एकुण 421 रक्तदात्यांनी रक्तदान केले. तर 150 जणांना विविध आजार व इतर कारणांमुळे रक्तदान करता आले नाही एकुण ५७१ जणांनी शिबीरात भाग घेतला .

सदर रक्तदान शिबिराचे उदघाटन पिंपरी चिंचवड शहराच्या महापौर उषाताई उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते झाले. तसेच विशेष उपस्थिती मध्ये सिनेअभिनेत्री पुजा रेड्डी यांनी आवर्जून आपली हजेरी लावली होती दिवसभर चाललेल्या रक्तदान शिबीरास पिं.चिं. शहराच्या उपमहापौर हिराबाई उर्फ नानी घुले ,  स्थायी समितीचे सभापती  संतोष लोंढे , नगरसेविका  सुजाताताई पालांडे , रक्ताचे नाते चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष श्री.राम बानगड, पिं.चिं.कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष श्री.बबनराव झिंजुर्डे , रिपब्लिकेन श्रमिक ब्रिगेड कामगार संघटनेचे अध्यक्ष नानासाहेब सोनवणे, पिं.चिं.मनपा पतसंस्थेचे मा.चेअरमन आबा गोरे यांनी भेट दिली.

त्याचप्रमाणे PMPMLचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक  डाॅ. राजेंद्रजी जगताप साहेब, PMPML सहव्यवस्थापकीय संचालक  डाॅ. चेतना केरूरे मॅडम , वाहतुक व्यवस्थापक  दत्तात्रय झेंडे , BRT प्रमुख सतिश गव्हाणे यांनी देखील रक्तदान शिबिरास भेट देवून रक्तदात्यांशी संवाद साधून मनोधर्य वाढविले.

त्याच प्रमाणे विशेष आर्ट आँफ लिविंग , BVG इंडिया लि. , अँन्थोनी गॅरेज प्रा.लि. यांच्या सुद्धा सर्व सदस्यांनी भाग घेतला होता. कार्यक्रमाचे नियोजन झोनल मॅनेजर तथा नेहरुनगर डेपोचे आगार व्यवस्थापक  संतोष माने, आगार अभियंता  राजकुमार माने यांच्या नेत्रुत्वाखाली करण्यात आले होते. तसेच कार्यक्रम पार पाडण्यासाठी भोसरी BRT बसस्थानकचे प्रमुख  काळुराम लांडगे, वरिष्ठ लिपीक  मिलींद शेवाळे,  जनार्दन घुले, एस.बी.राव,  विष्णु रायकर,  संजय कुटे,  प्रकाश मोकाशी,  जयसिंग यादव,  शंकर काळभोर,  गणेश जाधव,  महेंद्र पाटील,  राहुल हुलजुते, धनाजी वणवे यांनी मोलाचे परिश्रम घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.