Health Camp : किशोर भेगडे यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिराचे आयोजन

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष, स्वच्छ तळेगाव व सुंदर तळेगावचे शिल्पकार, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे वरीष्ठ उपाध्यक्ष किशोर भेगडे यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवारी (दि. 29) मोफत सर्वरोग निदान शस्त्रक्रिया शिबिराचे (Health Camp) आयोजन करण्यात आले आहे. मोफत नेत्र तपासणी व चष्मा वाटप, लहान मुलांचे मोफत हृदय शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत. तळेगाव दाभाडे येथील योगीराज हॉल मध्ये सकाळी नऊ ते पाच या वेळेत हे शिबीर होणार आहे.

याबाबत अभिषेक बोधे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. यावेळी सुरेश शिंदे, विनय भेगडे, किरण सलगरे, ललित पवार आदी उपस्थित होते.

 

किशोरभाऊ भेगडे मित्र परिवार आणि एम्स हॉस्पिटल व रिसर्च सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबीर (Health Camp) होणार आहे. हृदयविकार, मधुमेह, शुगर तपासणी, रक्त तपासणी, प्रोस्टेट ग्रंथाची वाढ, टॉन्सिल, श्वसनाचे आजार, जुनाट सर्दी, दमा, थायरॉईड, लहान मुलांचे सर्व आजार, मेंदूच्या समस्या, किडनीच्या समस्या, मुळव्याध, बद्धकोष्ठता, डोकेदुखी, मायग्रेन, इसीजी, स्त्री व पुरुषांचे लैंगिक विकार, स्त्रियांच्या पाळी संबंधित समस्या, ज्येष्ठ नागरिकांचे विकार आदींबाबत तपासणी होणार आहे. शिबिरात सहभागी होणा-यांच्या सर्व हृदयशस्त्रक्रिया मोफत, अन्जिओप्लास्टी स्टेन्टसह मोफत, कोरोनरी अन्जिओग्राफी, इतर सर्व डायग्नोस्टिक प्रोसिजर, मोतीबिंदू शस्त्रक्रिया व लेन्स मिळणार आहे.

Pune Fraud Case : अशी ही बनवाबनवी! “हे सामान बांधून ठेवा, फक्त तेलाच्या पाच पिशव्या द्या”, महिलेने दुकानदाराला फसवले

महिलांसाठी स्वतंत्र कक्ष आणि महिला डॉक्टरांची सोय आहे. नागरिकांनी शिबिरात येताना आधारकार्ड आणि जुना आजार असेल तर त्यांचे टेस्ट रिपोर्ट आणणे आवश्यक आहे. शिबिरात सहभागी नागरिकांना ने-आण करण्यासाठी विविध ठिकाणी रिक्षाची व्यवस्था देखील करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.