Pimpri Chichwad : रोजगार मेळावा व मतदान नाव नोंदणी शिबिराचे आयोजन

एमपीसी न्यूज :  पिंपरी येथील संदीप वाघेरे युवा मंच व इक्विटास स्मॉल फायनान्स लिमिटेडच्या वतीने सालाबाद प्रमाणे याही वर्षी भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याचे उद्घाटन संदीप वाघेरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले सदर कार्यक्रम वाघेरे यांच्या जनसंपर्क कार्यालय मध्ये संपन्न झाला.

याविषयी अधिक माहिती देताना वाघेरे म्हणाले की सालाबाद प्रमाणे याही वर्षी शहरातील तरुण व तरुणींना रोजगार मिळवा यासाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. कोरोनामुळे ओढवलेल्या बिकट परिस्थितीमध्ये अनेक तरुणां वर बेरोजगारीची कुर्‍हाड कोसळली होती.

त्यामुळे शहरातील तरुण-तरुणींना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी म्हणून रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. तसेच मतदानाच्या अधिकारापासून कोणीही वंचित राहू नये म्हणून मतदार नाव नोंदणी शिबिराचे देखील आयोजन करण्यात आले होते. सदर शिबिराचे नाव नोंदणीचे कामकाज 31 एप्रिल 2021 पर्यंत जनसंपर्क कार्यालयामध्ये सुरू राहणार आहे.

सादर कार्यक्रमाचे आयोजनात भाजपा महिला अध्यक्ष रंजना ताई जाधव, किरण शिंदे, रोहन वाधवाणी, आकाश चव्हाण, गणेश मंजाळ, इक्विटास फायनान्स श्री संग्राम पाटील,  माधुरी मॅडम यांचा सहभाग होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.