Chinchwad : पितृ पंधरवड्यानिमित्त कीर्तनाचे आयोजन

एमपीसी न्यूज – चिंचवड येथील श्री गजानन सत्संग मंडळाच्यावतीने दि. २९ सप्टेंबर ते ७ ऑक्टोबर या कालावधीत पितृ पंधरवडा कीर्तन आयोजित केली आहे, अशी माहिती हभप दिपक रास्ते यांनी दिली.

चिंचवड येथील श्री गजानन महाराज मंदिरात रोज सायंकाळी सहा ते आठ या वेळेत ही कीर्तने होणार आहे. त्यात मंजुषा भाबे, मंजुषा भावे, शरद जोशी, शेखर व्यास, दिपक रास्ते, मकरंद रामदासी, मकरंदबुवा रामदासी यांची कीर्तने होणार आहे. यांना हार्मोनियम शरद शिधये, कानिफ घैसास, श्रीराम खांडेकर हे साथसंगत करणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.