Akurdi News : श्री म्हाळसाकांत विद्यालयात माता पालक संघ सहविचार सभाचे आयोजन

एमपीसी न्यूज : श्री म्हाळसाकांत विद्यालय, आकुर्डी पुणे येथे आज गुरुवार दिनांक 2021 रोजी माता पालक संघाची सहविचार सभा घेण्यात आली. या सभेसाठी विद्यालयाचे प्राचार्य व माता पालक संघाचे अध्यक्ष सुनील लाडके तसेच विद्यालयाचे उपमुख्याध्यापक सुधीर रोकडे, पर्यवेक्षक सखाराम पुंडॆ, उपप्राचार्य खुशालदास गायकर, माता पालक संघाच्या सचिव  संगीता निंबाळकर सहसचिव जयश्री जगताप व माता पालक संघाचे सर्व महिला शिक्ष क व पालक सदस्य उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व सरस्वती पूजनाने झाली. सभेमध्ये प्रथम माता पालक संघाच्या वतीने विद्यालयाचे प्राचार्य सुनील लाडके यांना आझम कॅम्पस पुणे यांच्याकडून आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार जाहीर झाला आहे. त्याबद्दल सत्कार करण्यात आला.

प्राचार्य सुनील लाडके यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये सर्व महिला पालकांचे विद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षा मध्ये स्वागत केले. कोरोना कालावधीनंतर 4 ऑक्टोबर 2021 पासून इयत्ता आठवी ते बारावीच्या शाळा सुरू झाल्या आहेत. तरी पालकांनी आपल्या मुलांची काळजी घेऊन तसेच कोरोना काळातील सर्व नियमांचे पालन करून विद्यार्थ्यांना शाळेत पाठवत आहात त्या बद्दल आभार मानले तसेच अजूनही विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढावी याबद्दल अपेक्षा व्यक्त केली.

महिला पालकांनी आपल्या मुलांकडे अधिक लक्ष द्यावे, मोबाईलचा अतिवापर नको ,पालकांनी विद्यालयाला सहकार्य करावे, असे सांगितले. यानंतर सौ प्रत्युषा साळुंखे यांनी माता पालक संघाची उद्दिष्टे सांगून माता पालकांनी काय करावे, शाळेतील उपक्रमांमध्ये सहभागी व्हावे, इत्यादी बाबत मार्गदर्शन केले.

यानंतर सौ कविता अंबवलॆ यांनी विद्यार्थ्यांची काळजी कशी घ्यावी, मुलांनी अभ्यास कसा करावा, पालकांची भूमिका काय असावी ,विद्यार्थ्यांनी शालेय शिस्तीचे पालन कसे करावे, याबाबतचे सविस्तर मार्गदर्शन केले तसेच समाजामध्ये वावरत असताना आपल्या मुलांकडे पालकांचे लक्ष असायला हवे .मुलगा मुलगी असा भेद न करता मुलांची शारीरिक व मानसिक वाढ चांगली होण्यासाठी पालकांनी अधिकाधिक लक्ष द्यावे हेसुद्धा सांगितले.

माता पालक संघाच्या सचिव व समू प दे शी का सौ संगीता निंबाळकर यांनी सुजाण पालकत्वाची जबाबदारी, मुलांच्या वर्तन विषयक, अभ्यास विषयक समस्या कशा हाताळायला हवयात याबाबत समुपदेशन केले. पालक प्रतिनिधी स्मिता जगताप व  सुनिता अहिरे यांनी प्रातिनिधिक स्वरूपात आपल्या मनोगतामध्ये म्हाळसाकांत विद्यालयामध्ये राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांचे कौतुक केले व श्री म्हाळसाकांत विद्यालय हे पिंपरी-चिंचवड मध्ये एक आदर्श विद्यालय आहे असे सांगितले.

आभार प्रदर्शन सौ शामला पंडित यांनी केले व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयश्री जगताप यांनी केले. सभेसाठी एकूण शंभर सदस्य उपस्थित होते. तसेच विद्यालयातील इयत्ता आठवी ते दहावीच्या एकूण 280 विद्यार्थिनींना आरोग्यविषयक, वयात येताना काय काळजी घ्यावी, वर्तन विषयक समस्या, शालेय शिस्त ,याबाबत महिला शिक्षकांनी समुपदेशन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.