Vadgaon News : वडगाव मावळ येथे चार दिवस शिवछत्रपती जयंती महोत्सवाचे आयोजन

एमपीसी न्यूज – वडगाव मावळ येथील शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने शुक्रवार (दि. 18) ते सोमवार (दि. 21) या कालावधीत राजे शिवछत्रपती जयंती महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये मैदानी खेळ, महिलांसाठी कार्यक्रम, कीर्तन, विविध स्पर्धा, पुरस्कार वितरण सोहळा असे उपक्रम आयोजित केल्याची माहिती समितीचे संस्थापक भास्करराव म्हाळसकर, अध्यक्ष शेखर वहिले यांनी दिली.

शुक्रवार दि. 18 रोजी सकाळी 9 वाजता नगराध्यक्ष मयुर ढोरे यांच्या हस्ते शिवप्रतिमेचे अनावरण करून या महोत्सवाची सुरुवात होणार आहे. यानंतर सकाळी 9 ते 11 दगडी गोटी उचलण्याचा शिवकालीन मर्दानी खेळ होणार असून या कार्यक्रमाचे संयोजन जय बजरंग तालीम मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. सायंकाळी 7 वाजता शिवव्याख्याते निलेश जगताप (छत्रपती आणि मावळे) यांचे व्याख्यान होणार आहे.

शनिवार दि. 19 रोजी सकाळी सोसायटीचे चेअरमन बाळासाहेब म्हाळसकर व सर्व संचालकांच्या हस्ते शिवप्रतिमेचे अनावरण, सायंकाळी 4 वाजता महिलांसाठी खेळ रंगला पैठणीचा हा कार्यक्रम होणार असून यासाठी अनुक्रमे मानाची पैठणी, सोन्याची नथ व चांदीचा छल्ला अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. रविवार दि. 20 रोजी सायंकाळी 7 वाजता हभप सुनीताताई आंधळे यांचे कीर्तन होणार आहे.

सोमवार दि. 21 रोजी सकाळी 7 वाजता समितीचे अध्यक्ष शेखर वहिले यांच्या हस्ते शिवप्रतिमेचे अनावरण, शिवजन्मोत्सव, शिवज्योतींचे आगमन, सकाळी 9 वाजता वक्तृत्व स्पर्धा, दुपारी 2 वाजता रांगोळी स्पर्धा, सायंकाळी 5 वाजता भव्य मिरवणूक होणार आहे.

सायंकाळी 7 वाजता आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते, माजी राज्यमंत्री संजय(बाळा) भेगडे यांच्या अध्यक्षतेखाली व खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. यावेळी, राजमाता जिजाऊ, सांप्रदायिक भूषण, कर्तव्यदक्ष अधिकारी, कृषिनिष्ठ शेतकरी, उद्योगरत्न, दुर्गसंवर्धन, आदर्श सरपंच व क्रीडा पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. रात्री 8 वाजता रंगात रंगला महाराष्ट्र या मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

समितीचे अध्यक्ष शेखर वहिले, कार्याध्यक्ष गोपाळ ढोरे, कार्यक्रम प्रमुख राजेंद्र म्हाळसकर, श्रीधर चव्हाण, उपाध्यक्ष प्रशांत चव्हाण, संतोष भालेराव, मदन भिलारे, सचिव आकाश वारूळे, खजिनदार – योगेश कृ.म्हाळसकर, विराज हिंगे, अतुल म्हाळसकर, सरचिटणीस शरद मोरे, हरीश दानवे, ओंकार शिंदे, प्रसिद्धी प्रमुख – कल्पेश भोंडवे, सुनील कुडे, केदार बवरे आदी संयोजन करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.