Talegaon : अमली पदार्थ व अवैध वाहतूक विरोधात तळेगावमध्ये स्माईल सायकल रॅलीचे आयोजन

एमपीसी न्यूज : आज अमली पदार्थ व अवैध वाहतूक विरोधात तळेगावमध्ये (Talegaon) स्माईल सायकल रॅली काढण्यात आली. 26 जून हा जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन व अवैध वाहतूक विरोधी दिन म्हणून पळाला जातो. या निमित्ताने स्माईल व्यसनमुक्ती केंद्र, उर्से, रोटरी क्लब ऑफ तळेगाव सिटी व पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालाय यांच्या संयुक्त विद्यमाने या रॅलीचे आयोजन आज करण्यात आले होते.

सकाळी 6.30 वा पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालय येथून या रॅलीचा शुभारंभ झाला व समारोप स्माईल व्यसनमुक्ती केंद्रात झाला. सुरुवातीला व्यसनमुक्तीची शपथ घेऊन नगरसेवक सुरेश भोईर व रोटरी क्लबचे अध्यक्ष दिपक फल्ले यांनी रॅलीला हिरवा कंदील दाखवला व रॅलीला सुरुवात झाली. याप्रसंगी स्माईलचे अध्यक्ष हर्षल पंडित व वरिष्ठ पोलिस निरीक्षक (गुन्हे) अजय जोगदंड यांनी मनोगत मांडले.

Pune Municipal Election 2022 : पुण्यातील मतदारांमध्ये 2017 च्या तुलनेत 8.5 लाख संख्येने वाढ

या रॅलीच्या सांगता समारंभाचे प्रमुख पाहुणे (Talegaon) राहुल जाधव होते. त्यांनी आपल्या भाषणात एक व्यसनी गुन्हेगार ते समाजाच्या व्यसनमुक्तीसाठी झटणारा कार्यकर्ता असा त्यांचा जीवन प्रवास मांडला. पंडित यांनी आपले अभ्यासपूर्ण मत मांडताना व्यसनधीन व्यक्तींची आकडेवारी मांडली. ते म्हणाले, की सध्या 100 व्यसनी व्यक्तींमागे 27 व्यक्ती व्यसनाधीन होतात. अध्यक्षीय भाषणात जोगदंड यांनी नार्कोटिक्स विभाग कसे काम करते याची माहिती दिली. तसेच समाजाने अमली पदार्थांविरोधात कसे उभे राहावे? याबद्दलचे त्यांचे विचार मांडले.

या प्रसंगी सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रशांत महाले, पोलिस उपनिरीक्षक राजन महाडिक व इतर जण उपस्थित होते. याप्रसंगी सहभागी सायकलस्वारांना पदक व प्रमाणपत्र देण्यात आले. या कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ते व रुग्णामित्र उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.