Pimpri : रा.स्व.संघातर्फे शहरात 5 ठिकाणी दीपावली स्नेहमिलन कार्यक्रमाचे आयोजन

एमपीसी न्यूज – दरवर्षीप्रमाणे याही वर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे प्रकाशपर्व साजरे करण्याकरिता शहरातील विविध भागात पाच ठिकाणी दीपावली स्नेहमिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

भारतीय संस्कृतीत “तमसो मा ज्योतिर्गमय” हा संदेश देणाऱ्या दीपावली सणाचे विशेष महत्व आहे, या आनंददायी उत्सवाच्या निमित्याने हे प्रकाशपर्व साजरे करण्याकरिता राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे आकुर्डी, देहू, भोसरी,संत तुकाराम, चिंचवड गटातर्फ़े कौटुंबिक स्नेहमिलन कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

आकुर्डी गटाचा स्नेहमिलन कार्यक्रम दि.७नोव्हेंबर बुधवर रोजी वाढोकर सभागृह ज्ञानप्रबोधिनी विद्यालय निगडी प्राधिकरण येथे सकाळी ७.३० वाजता आयोजित केला असून प्रमुख वक्ते म्हणून विनायकराव डंबीर सहकार्यवाह जनकल्याण समिती रा.स्व.संघ महाराष्ट्र प्रांत उपस्थित राहणार आहेत. देहू गटाचा कार्यक्रम दि.7 नोव्हेंबर रोजी सकाळी 7 वाजता एस.एस. पि. गणेश शाळा नेवाळे वस्ती, चिखली-आकुर्डी रोड चिखली येथे असून प्रमुख वक्ते म्हणून प्रदीप कुरुलकर ,जेष्ठ शास्त्रज्ञ डी.आर.डी.ओ. पाषाण असणार आहेत.

चिंचवड गटाचा स्नेहमिलन दर्शन सभागृह, चिंचवड येथे दि.7 नोव्हेंबर सकाळी 7.30 वाजता होणार असून प्रमुख वक्ते प्रज्ञा प्रवाहाचे अ. भा.कार्यकारिणी सदस्य प्रा.प्रसन्न देशपांडे मार्गदर्शन करणार असून प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.विक्रम काळे समन्वयक फतेचंद जैन ज्युनिअर कॉलेज उपस्थित राहणार आहेत. संत तुकाराम गटाचा कार्यक्रम 7 नोव्हेंबर ला सकाळी 7.30 वाजता एस.एन.बी.पि. इंटरनॅशनल स्कुल, म्हाडा कॉलोनी जवळ मोरवाडी येथे होणार असून प्रमुख वक्ते म्हणून प्रसिध्द सिनेअभिनेते, दिग्दर्शक, व्याख्याते राहुल सोलापूरकर असणार आहेत. भोसरी गटातर्फ़े रविवार दि.4 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजता  इंदुबन मंगल कार्यलय भोसरी उड्डाणपूल जवळ आयोजन केले असून इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे मार्गदर्शन करणार असून प्रमुख पाहुणे म्हणून पि.चि. ब्रह्मकुमारी विश्वविद्यालय संचालिका राज करुणा दीदी उपस्थित राहणार आहेत.
9

कार्यक्रमाच्या ठिकाणी वनवासी कल्याण आश्रमातर्फे वनवासी बांधवांना दिवाळी साजरी करण्याकरिता फराळ संकलन देखील केले जाणार आहे. त्या त्या भागात होणाऱ्या या कौटुंबिक स्नेहमीलन कार्यक्रमात सर्वांनी सहकुटूंब सहभागी होऊन तेजोमय पर्वाचा आनंद द्विगुणित करण्याचे आवाहन जिल्हा संघचालक डॉ. गिरीश आफळे यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.