Chinchwad: चिंचवडला जीवन आनंद सोहळ्याचे आयोजन

एमपीसी न्यूज –जेरियॅट्रिक वेलनेस फाऊंडेशन यांच्या संकल्पनेने चिंचवड येथील लोकमान्य हॉस्पिटल येथे नुकतेच जीवन आनंद सोहळ्याचे आयोजन केले होते.

 डॉ. राकेश पाटील यांनी सांध्याच्या काळजीविषयी मार्गदर्शन केले. जवळपास दहा  भौतिक उपचार तज्ञांनी ज्येष्ठांची तपासणी करुन व्यायामाचे प्रात्याक्षिकासह महत्व समजावून सांगितले. डॉ. रोहन काटे यांनी हृदयरोग व मधुमेह प्रतिबंधात्मक उपाय योजनांविषयी मार्गदर्शऩ केले. आहार तज्ञ माधवी जेजुरीकर यांनी ज्येष्ठांना आहाराविषयक सल्ला दिला.

रोबोटिक पध्दतीने ऑपरेशन झालेले सुमारे 67 रुग्णांनी या सोहळ्यात सहभाग घेतला.यावेळी हेरंब चिंचणीकर यानी सुरेल गीतांचा कार्यक्रम सादर केला. पिंजरा चित्रपटासाठी स्लाईड हि-दम देणा-या जयंत अत्रे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. श्रीकृष्ण जोशी यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.