Pimpri : विश्व हिंदु परिषद बजरंग दलाचे रविवारी महारक्तदान शिबिराचे आयोजन 

एमपीसी  न्यूज – विश्व हिंदू परिषद बजरंग दल पिंपरी-चिंचवड शहर विभागाच्यावतीने रविवारी दि. २८ ऑक्टोबरला शहरात व मावळ विभागात महारक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती विश्व हिंदु परिषदेचे जिल्हा मंत्री संदेश भेगडे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

शिबिरा बाबत माहिती देताना ते म्हणाले की, हे महारक्तदान शिबिर शहरात विविध ठिकाणी होणार असून १० ते १२ हजार बाटल्या रक्तसंकलित करण्यात येणार आहे. या शिबिराअंतर्गत पिंपरी गावात सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत भैरवनात मंदीर येथे रक्तदात्यांनी सहभागी व्हावे. चिंचवड-मनपा शाळा, वाल्हेकरवाडी चौक आणि केंद्राई गोशाळा सुदर्शन नगर, भोसरी – सखुबाई गवळी उद्यान, मोशी- भारतमाता चौक , चिंबळी – जिल्हा परिषद शाळा, चिखली- विठ्ठल रखुमाई मंदीर आणि घरकुल वसाहत, निगडी-सिध्दी विनायक नगरी आकुर्डी – संजय काळे मैदान, कासारवाडी – गणेश मंदिरासमोर शास्त्रीनगर, थेरगाव – बोट क्लब रोड दत्तनगर, शिवमंदीर गणेश नगर, गणपती मंदिर भोरडेनगर, साई मंदिर थेरगाव गावठाण, वाकड – म्हातोबा मंदिर, पिंपळे सौदागर – महादेव मंदिर पोलिस चौकीसमोर, पिंपळे गुरव – ज्येष्ठ नागरिक संघ सुदर्शन नगर, बोपखेल – मारुती मंदिर, दापोडी- हनुमान मंदिर दापोडी गावठाण, सांगवी – नरसिंह हायस्कुल, रहाटणी – नखाते वस्ती, काळेवाडी- विठ्ठल रुक्मिणी मंदिर, इंद्रायणीनगर – मिनी मार्केट, इंद्रायणी नगर, यमुनानगर – सावित्रीबाई फुले बिल्डींग , रुपीनगर – हनुमाननगर अशा सत्तावीस ठिकाणी आणि मावळ भागात सतरा ठिकाणी महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

यावेळी बजरंग दलाचे जिल्हा संयोजक कुणाल साठे, विश्व हिंदु परिषदेचे शहर मंत्री नितीन वाटकर, बजरंग दल शहर संयोजक नाना सावंत, सागर चव्हाण, अभिजित शिंदे आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.